बुधवार, 1 मे 2024
लक्षवेधी :
  आयपीएलवर ऑनलाईन सट्टा: दहा जणांना अटक, अहेरी पोलिसांची कारवाई             रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत           

विनयभंग करणाऱ्या आरोपीस २ वर्षे ९ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा

Wednesday, 25th July 2018 06:21:47 AM

कुरखेडा,ता.२५: तरुणीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने २ वर्षे ९ महिन्यांचा कारावास व ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. राजू गंगाराम नैताम, रा .मालदुगी असे दोषी इसमाचे नाव आहे.

८ नोव्हेंबर २०१६ रोजी पीडित तरुणी आपल्या शेतावर गेली असता राजू नैताम याने शेतावर जाऊन तिचा विनयभंग केला.  याबाबत पीडित तरुणीच्या तक्रारीवरून कुरखेडा पोलिसांनी आरोपी राजू नैताम याच्यावर भादंवि कलम ३५४,३५४अ(२) व ५०९ अन्वये गुन्हा दाखल केला होता. तत्कालिन पोलिस निरीक्षक विलास सुपे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक आनंद सहारे यांनी तपासात सबळ साक्ष पुरावे गोळा करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणाचा निकाल २३ जुलै रोजी लागला. येथील प्रथम श्रेणी न्यायाधीश बागडे यांनी आरोपीस २ वर्षे ९ महिन्यांचा कारावास व ३ हजार रुपये दंडांची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे अॅड. अविनाश नाकाडे यांनी बाजू मांडली. पोलिस हवालदार प्रभू पिलारे यांनी त्यांना सहकार्य केले


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
J3U04
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना