बुधवार, 8 मे 2024
लक्षवेधी :
  बालंबाल बचावले गडचिरोलीचे पोलिस! टिपागड पहाडावर आढळली शक्तीशाली स्फोटके             जादुटोण्याच्या संशयावरुन वृद्धाला दिले तप्त सळाखीचे चटके, एटापल्ली तालुक्यातील दुसरी घटना             जादुटोणा प्रकरण: दोघांना जिवंत जाळणाऱ्या १५ आरोपींना ५ दिवसांची पोलिस कोठडी             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             आयपीएलवर ऑनलाईन सट्टा: दोघांवर गुन्हे दाखल, देसाईगंज पोलिसांची कारवाई             गडचिरोली जिल्हा हादरला: जादुटोण्याच्या संशयावरुन दोघांना जीवंत जाळले, १४ जणांना अटक, एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा येथील घटना           

जगन्नाथ बोरकुटे यांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या निर्णयास ग्रामविकास विभागाची स्थगिती

Thursday, 12th July 2018 08:18:22 AM

गडचिरोली, ता.१२: तालुक्यातील वसा-पोर्ला जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य जगन्नाथ बोरकुटे यांचे सदस्यत्व अनर्ह करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला ग्रामविकास मंत्रालयाने स्थगिती दिली आहे.

फेब्रुवारी २०१७ मध्ये गडचिरोली जिल्हा परिषदेची निवडणूक झाली. या निवडणुकीनंतर भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस व आदिवासी विद्यार्थी संघाने युती करुन सत्ता प्रस्थापित केली. त्यानंतर विषय समित्यांची निवडणूक झाली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले जग्गनाथ बोरकुटे यांनी पक्षाचा व्हीप झुगारुन विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मतदान केले. याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करुन बोरकुटे यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली होती. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी २० जून २०१८ रोजी निर्णय देत बोरकुटे यांचे सदस्यत्व रद्द केले होते.

जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाविरोधात बोरकुटे यांनी ग्रामविकास मंत्रालयाकडे अपिल केले होते. आज मंत्रालयाने बोरकुटे यांच्या अपिलावर सुनावणी करीत त्‍यांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या निर्णयास स्थगिती दिली. प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत ही स्थगिती कायम राहणार असल्याचे बोरकुटे यांनी सांगितले. नागपूरचे अॅड. अनिल किलोर यांच्या मार्गदर्शनाखाली अॅड. लोडल्लीवार यांनी बोरकुटे यांची बाजू मांडली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
L824V
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना