बुधवार, 1 मे 2024
लक्षवेधी :
  आयपीएलवर ऑनलाईन सट्टा: दहा जणांना अटक, अहेरी पोलिसांची कारवाई             रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत           

तीन महिलांचा नदीत बुडून मृत्यू

Sunday, 1st July 2018 07:08:29 AM

भामरागड, ता.१: कपडे धुण्यासाठी गेलेल्या तीन महिलांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना काल(ता.३०) दुपारी हिदूर गावानजीक घडली. सौमी पोरिया दुर्वा(६५),चंदा रामजी गोटा(१५) व जानकी बिरसू तिम्मा(२६) अशी मृत महिलांची नावे आहेत.

काल हिदूर येथील चार महिला गावानजीकच्या पामुलगौतम नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, कपडे धूत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने चारही महिला पाण्यात वाहून जाऊ लागल्या. ही बाब शेजारी असलेल्या गुराख्याच्या लक्षात येताच त्याने नदीत उडी मारुन चौघींना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, एकाच महिलेला वाचविण्यात त्याला यश आले. अन्य तीन महिला वाहून गेल्या. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी शोधमोहीम राबविली. परंतु काल रात्रीपर्यंत तिघींचा शोध लागला नव्हता. आज महसूल व पोलिस अधिकाऱ्यांच्या मदतीने पुन्हा शोध मोहीम राबविण्यात आली. सकाळी ११ वाजताच्या सुमारास तिघींचे मृतदेह आढळून आले. तहसीलदारांनी घटनास्थळी जाऊन मृतकांच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
1ZU4C
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना