सोमवार, 23 जुलै 2018
लक्षवेधी :
  माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या दुधबळे यांचे दीर्घ आजाराने निधन             रोहयोचे १८ कोटी रुपये तत्काळ द्या:आ.डॉ.देवराव होळी यांची विधानसभेत मागणी             अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा-गडचिरोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचा निवाडा             पहिल्‍याच पावसात वाहून गेला चिरचाडी येथील कोल्हापुरी बंधारा, निकृष्ट बांधकामाचा परिणाम             नागपूर व गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात फ्लॅटस्, प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ७९७२८८०५१३           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
96%
नाही :
4%

शेकाप कार्यकर्त्यांचा जत्था सत्यशोधक अधिवेशनासाठी रवाना

Sunday, 4th March 2018 08:15:45 AM

गडचिरोली, ता.४: अखिल भारतीय सत्यशोधक समाजाचे ३९ वे अधिवेशन ४ व ५ मार्च रोजी भोईवाडा, परळ मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा जत्था पक्षाचे जिल्हा निमंत्रक रामदास जराते यांच्या नेतृत्वात मुंबईसाठी रवाना झाला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते सत्यशोधक अधिवेशनाचे उद्घाटन होणार असून, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब कसबे, कवी अर्जुन डांगळे, बीआरएसपीचे नेते अॅड.सुरेश माने यांच्यासह राज्यभरातील सत्यशोधक व पुरोगामी साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते या अधिवेशनात सहभागी होणार आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ.भाई जयंत पाटील हे या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष आहेत. या अधिवेशनात शेतकरी, शेतमजूर, कामगार व कष्टकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यात येणार असून, सरकारच्या भांडवलदारधार्जिण्या धोरणाबाबत आवाज उठविण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे जिल्हा निमंत्रक रामदास जराते यांनी दिली.

श्री.जराते यांच्यासोबत देवसाय आतला, चंद्रकांत भोयर, अशोक किरंगे, भामराज हर्षे, सोमकांत कडुकार, मुखरु दांडवे, प्रकाश सहारे, राजेंद्र धोडरे, संतोष बुरांडे, बारसाय दुग्गा, शोभाताई मेश्राम, पुष्पा कोतवालीवाले, योगीता भोयर, जयश्री वेळदा, सोनिया भगत, सपना पुंगाटी, विजया मेश्राम, पुष्पा चापले इत्यादी कार्यकर्ते रवाना झाले आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
E74MC
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना