सोमवार, 23 जुलै 2018
लक्षवेधी :
  माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या दुधबळे यांचे दीर्घ आजाराने निधन             रोहयोचे १८ कोटी रुपये तत्काळ द्या:आ.डॉ.देवराव होळी यांची विधानसभेत मागणी             अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा-गडचिरोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचा निवाडा             पहिल्‍याच पावसात वाहून गेला चिरचाडी येथील कोल्हापुरी बंधारा, निकृष्ट बांधकामाचा परिणाम             नागपूर व गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात फ्लॅटस्, प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ७९७२८८०५१३           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
96%
नाही :
4%

डॉ.प्रकाश व डॉ.मंदाकिनी आमटे लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित

Friday, 15th December 2017 02:41:08 PM

गडचिरोली, ता.१५: रमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित सुप्रसिद्ध समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे व डॉ.मंदाकिनी आमटे यांना आज कोलकाता येथे 'देशम' संस्थेतर्फे आयोजित तिसऱ्या कोलकाता इंटरनॅशनल वाईल्डलाईफ एन्व्हार्नमेंट फिल्म फेस्टीवलमध्ये गोल्डन टायगर लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. 

कोलकाता येथे आयोजित एका खास समारंभात सुप्रसिद्ध सिनेअभिनेते खा.चिरंजीव चक्रवर्ती, सिनेअभिनेत्री खा.संध्या मुखर्जी यांच्या हस्ते डॉ.प्रकाश व डॉ.मंदाकिनी आमटे यांना गोल्डन टायगर लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड प्रदान करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक आदित्य मुखर्जी, प्रसिद्ध क्रिकेटपटू संबारन बॅनर्जी, चित्रपट निर्मात्या व ग्रीन ऑस्कर विजेत्या अश्विका कपूर उपस्थित होते. केंद्र सरकारच्या वने व पर्यावरण समितीच्या सदस्य खा.संध्या रॉय यांच्या हस्ते फेस्टिवलचे उद्घाटन झाले.

याप्रसंगी डॉ.प्रकाश व डॉ.मंदाकिनी आमटे यांनी ३०० विद्यार्थ्यांना वन्यजीव व पर्यावरण रक्षणाची शपथ दिली. अतिथींनी डॉ.प्रकाश व डॉ.मंदाकिनी आमटे यांनी वन्यजीव व पर्यावरण रक्षणासाठी केलेल्या कार्याचा गौरव केला. या फेस्टीवलसाठी ११६ देशांमधून सुमारे २३०० चित्रपटांचे नामांकन आले असून, ते १७ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. 

मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन..

डॉ.प्रकाश आमटे यांची सेंट्रल अॅनिमल वेल्फेअर बोर्डाच्या सदस्यपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.प्रकाश आमटे यांना पत्र पाठवून अभिनंदन केले आहे. अतिदुर्गम अशा भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून एक समर्पित सामाजिक कार्याचा वस्तुपाठ आपण घालून दिला आहे. आपल्या निवडीने प्राणी कल्याणाबाबत जनजागृती होण्यास निश्चित मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
R18PZ
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना