शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ४ जणांना अटक

Wednesday, 21st June 2017 08:28:41 AM

 

गडचिरोली, ता.२१: वाढदिवस साजरा करण्याचे गाजर दाखवून एका अल्पवयीन मुलीवर चार युवकांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना चंद्रपुरात घडली. याप्रकरणी आष्टी पोलिसांनी कुणाल बोरकुटे, मंगेश खेवले (दोन्ही रा.बोरगाव ता.गोंडपिपरी), संतोष लिपटे रा.नागपाडा घुग्गूस व अविनाश पिंपळकर रा.बालाजी वॉर्ड चंद्रपूर या चौघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आष्टी येथील एका १६ वर्षीय मुलीची उपरोक्त आरोपींपैकी एका युवकाशी मिस्ड कालवरुन ओळख झाली. काही दिवसांनंतर दोघांचे मोबाईलवर संभाषण सुरु झाले आणि पुढे ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्या प्रियकराने १६ जूनला आपला वाढदिवस असल्याचे सांगून तो साजरा करण्यासाठी पीडित मुलीला चंद्रपूरला बोलावले. त्यानुसार ती चंद्रपूरला तिच्या प्रियकराकडे गेली. मात्र १७ जूनला कुणाल बोरकुटे, मंगेश खेवले, संतोष लिपटे व अविनाश पिंपळकर या चौघांनीही तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यामुळे प्रकृती बिघडल्यामुळे तिला दोघे जण चंद्रपूरच्या एका खासगी दवाखान्यात भरती करण्यासाठी घेऊन गेले. मात्र परिस्थिती बघून खासगी डॉक्टरांनी तिला दवाखान्यात भरती न करता पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर चंद्रपूर पोलिसांनी पीडित मुलीला शासकीय रुग्णालयात भरती केले. इकडे मुलगी दोन दिवसांपासून गायब असल्याने तिचे कुटुंबीय चिंतेत होते. अशातच पीडित मुलगी चंद्रपूरच्या दवाखान्यात भरती असल्याची माहिती तिच्या गोंडपिपरी येथील काकाला कळली. त्याने चंद्रपूरला जाऊन पीडित मुलीची भेट घेतली असता, तिने आपबिती सांगितली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आष्टी पोलिस ठाण्यात घटनेची तक्रार करण्यात आली. १९ जूनला आष्टी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री.लुगडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चंद्रपुरातून चारही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्यावर भादंवि कलम ३६३, ३७६(३), ३४२, बालकाचे लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा सहकलम १३ व अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली. काल(ता.२०) त्यांना गडचिरोली न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने चौघांनाही २७ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे घटनेचा तपास करीत आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
TK90P
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना