बुधवार, 8 मे 2024
लक्षवेधी :
  बालंबाल बचावले गडचिरोलीचे पोलिस! टिपागड पहाडावर आढळली शक्तीशाली स्फोटके             जादुटोण्याच्या संशयावरुन वृद्धाला दिले तप्त सळाखीचे चटके, एटापल्ली तालुक्यातील दुसरी घटना             जादुटोणा प्रकरण: दोघांना जिवंत जाळणाऱ्या १५ आरोपींना ५ दिवसांची पोलिस कोठडी             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             आयपीएलवर ऑनलाईन सट्टा: दोघांवर गुन्हे दाखल, देसाईगंज पोलिसांची कारवाई             गडचिरोली जिल्हा हादरला: जादुटोण्याच्या संशयावरुन दोघांना जीवंत जाळले, १४ जणांना अटक, एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा येथील घटना           

हजारो पोलिस जवानांनी गिरविले योग व प्राणायामाचे धडे

Wednesday, 21st June 2017 06:02:52 AM

 

गडचिरोली, ता.२१: आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून आज गडचिरोलीसह जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमधील पोलिस जवानांनी योग व प्राणायामाचे धडे गिरवून दैनंदिन ताण-तणावापासून मुक्ती मिळविण्याचा प्रयत्न केला.

पोलिस कर्मचाऱ्यांचे दैनंदिन जीवन हे अतिशय तणावपूर्ण व धकाधकीचे असते. हा तणाव घालवून जीवन आनंदी करणे आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या हेतूने आज गडचिरोली येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर योग व प्राणायाम शिबिर घेण्यात आले. या शिबिरात शेकडो पोलिस जवान व अन्य कर्मचारी सहभागी झाले होते. पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अपर पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलिस हरी बालाजी, पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, उपविभागीय पोलिस अधिकारी सागर कवडे व एसआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी यावेळी स्वत: उपस्थित राहून योगासने व प्राणायाम केला. पतंजली योग समितीच्या वर्षा देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वांना योग व प्राणायामाचे धडे दिले. गडचिरोलीशिवाय, चामोर्शी पोलिस ठाणे, पोटेगाव, येलचिल पोलिस मदत केंद्र व अन्य पोलिस ठाण्यांमध्येही अशाप्रकारच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
3W0CJ
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना