शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

आलापल्लीत भर दिवसा कंत्राटदाराची हत्या

Saturday, 16th August 2014 05:08:27 AM

गडचिरोली, ता. १६ : अहेरी तालुक्यातील मध्यवर्ती व गजबजलेले गाव असलेल्या आलापल्ली येथे आज (ता. १६) दुपारी पाऊण वाजता एका कंत्राटदाराची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याने खळबळ माजली आहे.  गोविंद गिते असे मृत कंत्राटदाराचे नाव असून, पोलिसांनी आरोपी सुनील पांढरे (३४) रा. चंद्रपूर यास अटक केली आहे. 

गिते हे आलापल्ली येथील शहीद अजय मास्टे चौकात उभे असताना आरोपी सुनील पांढरे तेथे आला. त्याने गोविंद गिते यांच्यावर चाकूने सपासप वार करून घटनास्थळावरून पळ काढला. यावेळी घटनास्थळीच श्री. गिते यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सुनील पांढरे याने पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. पोलिसांनी त्यास खुनाच्या गुन्ह्याखाली अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून गोविंद गिते व सुनील पांढरे हे आलापल्ली येथे वास्तव्य करून अहेरी उपविभागात कंत्राटाची कामे करीत होते. काही कामांमध्ये सुनील पांढरे याच्याशी त्यांची भागिदारी होती. सिरोंचा येथील सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दोन पुलांची कामे करण्यात आली. तसेच व्यंकटरावपेठा येथील पूल व विमलगुडम येथील इमारतीचे बांधकाम गिते यांनी केले होते. परंतु त्यातील सुमारे ४ लाख रुपये एवढी नफ्याची रक्कम आपणास न दिल्याने आपण गिते यांची हत्या केली, असे आरोपी सुनील पांढरे याने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
E6RKC
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना