/* */
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2023
लक्षवेधी :
  गडचिरोली:सिझेरियन प्रसूती झालेल्या दोन महिलांचा मृत्यू झाल्याने खळबळ             लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या घडकेत एकाच कुटुंबातील ३ जण ठार, १ जखमी-चामोर्शी येथील घटना             ३३ टक्के आरक्षण देऊन पंतप्रधानांनी महिलांचा सन्मान केला: खा.अशोक नेते यांचे प्रतिपादन           

|| सुनामी ||

Tuesday, 28th April 2015 05:20:50 AM

 

समुद्रात भूस्तरे सरकली

भूकंपे धरणी हादरली

समुद्रास ढवळून खवळली

किनारा चिरून आत शिरली ||१||

प्रलयंकारी लाट उसळली 

कर्दनकाळ बनून आली 

सुनामी राक्षसी भुकेली

पशू ,माणसे खाऊन गेली ||२||

मर्यादा ओलांडून आली

जहाजे , वाहने वाहून गेली

मृत्यूच्या रंगमंची चढली

तांडव नृत्य करून गेली   ||३||

क्षणात अशी ती धडकली

उध्वस्त सारे करून गेली

घरे, गावे नामशेष झाली

शहरे सारी उधळून गेली ||४||

मृत्यूची पहाट उजाडली

प्रेतांचा सडा घालून गेली

चिखलात किती प्रेते रुतली

शहरात प्रेतकळा पसरली ||५||

हजारो तिने घेतले बळी

ओस पडली शहरे सगळी

अणूभट्टीत आग भडकली

उरली जनता बेघर झाली ||६||

एकवीसाव्या शतकात आली

शास्त्रज्ञास  का नाही कळली ?

माणसा शून्यात ठेवून गेली

शास्त्रास आव्हान देऊन गेली ||७||

 

कवी - @सुरेश पित्रे.

पत्ता- " वैद्य सदन ", पहिला मजला, राघोबा शंकर रोड, 

चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१

भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९           

Email ID - kharichavata@gmail.com


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
14T4Z
  © 2014 - 2023 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना