शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

चितळाची शिकार करणाऱ्यास अटक

Wednesday, 4th March 2015 07:51:28 AM

 

चामोर्शी, ता.४: चितळाची शिकार करुन त्याचे मांस विकण्यासाठी नेत असताना आज भल्या सकाळी कर्कापल्ली फाटयावर वनकर्मचाऱ्यांनी एका युवकास रंगेहाथ पकडून अटक केली. पंकज मनोरंजन बिस्वास(३०) असे अटकेतील आरोपीचे नाव असून, मुख्य आरोपी सुखलाल सनातन राडी हा मुख्य आरोपी फरार आहे.

सुखलाल राडी याने घोट-श्यामनगर जंगलातून चितळाची शिकार केली. त्यानंतर त्याने श्यामनगर येथील पंकज बिस्वास यास बोलावून त्याच्याकडे चितळाचे मांस भरलेल्या प्रत्येकी १ किलो वजनाच्या २६ पिशव्या दिल्या. हे मांस चामोर्शी येथे जाऊन विकण्यास पंकजला सांगण्यात आले. ही माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी शंकर गाजलवार यांच्या नेतृत्वात वनकर्मचारी संजय पेंपकवार, शंकर गुरनुले, प्रांजय वडेट़टीवार आदींनी पंकज बिस्वास यास चितळाच्या मांसासह रंगेहाथ पकडून अटक केली. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
1UF9Y
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना