शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

जुन्या कामांच्या मुद़दयावर गाजली जि.प.ची सर्वसाधारण सभा

Wednesday, 4th March 2015 07:56:49 AM

 

गडचिरोली, ता.४: आज आयोजित जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत बांधकाम समितीने नामंजूर केलेली मागची कामे, आंबेशिवणी येथील दलित नागरिकांची रखडलेली घ्ररकुलाची रक्कम आणि ओबीसी प्रवर्गातील नागरिकांच्या हिताच्या मुद़दयावर गाजली.

आजच्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे, उपाध्यक्ष जीवन नाट, बांधकाम सभापती अतुल गण्यारपवार, समाजकल्याण सभापती विश्वनाथ भोवते, कृषी सभापती अजय कंकडालवार, महिला व बालकल्याण सभापती सुवर्णा खरवडे, मुख्य कार्यपालन अधिकारी संपदा मेहता यांच्यासह विविध विभागप्रमुख व जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.

या सभेत जिल्हा परिषद सदस्या छाया कुंभारे यांनी मागच्या बांधकाम समितीने मंजूर केलेली कामे पूर्ववत करावी, अशी मागणी केली. तेराव्या वित्त आयोगाच्या निधीतून असलेल्या या कामांना प्रत्येक सदस्याच्या क्षेत्रांना समान न्याय दिला होता. त्यामुळे ही कामे सुरु करावी, अशी मागणी केली. परंतु ही मागणी धुडकावून लावण्यात आली. अलिकडेच जिल्हा परिषद  सदस्य म्हणून निवडून आलेले प्रशांत वाघरे यांनी एससी, एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांप्रमाणेच ओबीसी व अन्य प्रवर्गातील शेतकऱ्यांनाही शेळया व बोकड वाटप योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी केली. तसेच ओबीसी विद़यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करुन ती तत्काळ द़यावी, राज्यपालांनी काढलेली पेसाविषयक अधिसूचना रद़द करण्यासंदर्भात जिल्हा परिषदेने ठराव घ्यावा, अशी मागणी केली. विशेष म्हणजे, प्रशांत वाघरे यांनी आंबेशिवणी येथील २२ घ्ररकुल लाभार्थींची रक्कम रखडल्याचा मुद़दा उपस्थित केला. या लाभार्थींना ग्रामसभेच्या ठरावानुसारच डीआरडीएने घ्ररकुल मंजूर केले. परंतु त्यांना यापूर्वी बेघर मिळाले होते, अशा तक्रारीवरुन त्यांच्या घ्ररकुलाची रक्कम प्रलंबित ठेवण्यात आली. घरकुलधारकांना रक्कम न मिळाल्याने ते अडचणीत आले आहेत. त्यामुळे त्यांना तत्काळ रक्कम देण्यात यावी, अशी मागणी वाघरे यांनी केली. यावर संवर्ग विकास अधिकाऱ्यांना संबंधित लाभार्थींना रक्कम देण्यात येईल, असे आश्वासन दिले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
ERGU5
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना