शनिवार, 27 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

गावागावात जाऊन गाव चलो अभियान राबवा:लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे यांचे आवाहन

Sunday, 4th February 2024 06:19:33 AM

गडचिरोली,ता.४: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाचा सर्व क्षेत्राचा विकास झपाट्याने होत आहे. त्यामुळे शासनाच्या कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी बूथ संयोजक आणि प्रवासी कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन गाव चलो अभियान राबवावे, असे आवाहन भाजपचे लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे यांनी केले.

भारतीय जनता पक्षातर्फे आरमोरी विधानसभा क्षेत्रातील ठाणेगाव येथे गाव चलो अभियानाबाबत आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी आ.कृष्णा गजबे, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, जिल्हा सचिव नंदू पेट्टेवार, तालुकाध्यक्ष पंकज खरवडे, भारत बावनथडे, नगराध्यक्ष पवन नारनवरे, पडोळे, नीता ढोरे, भास्कर बोडणे, श्रीहरी कोपुलवार, ईश्वर पासेवार, डॉ.ओमप्रकाश नाकाडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, प्रवासी कार्यकर्ते, सुपर वॉरिअर्स, बूथ पालक व बूथ प्रमुख उपस्थित होते.

गरीब कल्याण, महिला सशक्तीकरण, देशाची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा अशा अनेक क्षेत्रात मोदी सरकारने मोठी कामगिरी करीत आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उंचावले आहे, असेही प्रमोद पिपरे यावेळी म्हणाले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
FV8GV
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना