शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

न्यायाधीशांना धमकी देणारे पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांना अखेर अटक

Saturday, 3rd June 2023 07:24:44 AM

गडचिरोली,ता.३: चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अतुल गण्यारपवार यांना बेदम मारहाण केल्याच्या प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचे आदेश देणाऱ्या न्यायाधीशांना धमकावल्याप्रकरणी निलंबित पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांना पोलिसांनी शुक्रवारी २ जूनच्या रात्री अटक केली. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीदरम्यान २० एप्रिलच्या पहाटे पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांनी त्या निवडणुकीतील एक उमेदवार आणि माजी सभापती अतुल गण्यारपवार यांना बेदम मारहाण केली होती.यासंदर्भात गण्यारपवार यांनी पोलिसांत तक्रारही केली होती.परंतु गुन्हा नोंद न झाल्याने गण्यारपवार यांनी चामोर्शी येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात धाव घेतली होती. सुनावणी दरम्यान प्रथमवर्ग न्याय दंडधिकारी  एन. डी. मेश्रामयांनीपोलिसनिरीक्षक राजेश खांडवे यांच्यावर कलम २९४, ३२४, ३२६ अन्वये गुन्हा नोंदविण्याचे आदेश २० मे रोजी दिले. या आदेशानंतर संतप्त झालेले पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांनी २५ मे रोजी सकाळी न्यायाधीश मेश्राम यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांना शिवीगाळ करीत हुज्जत घातली. याप्रकरणी न्यायाधीशांनी जिल्हा व सत्र न्यायाधीशांना अवगत केल्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर चामोर्शी पोलिसांनी राजेश खांडवे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. दुसऱ्या दिवशी राजेश खांडवे यांना निलंबित करण्यात आले.

नंतर खांडवे हे नागपूरला दवाखान्यात भरती होते. काल ते गडचिरोलीला आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना अटक केली. कालच त्यांना चामोर्शीच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी साहिल झरकर यांनी दिली.

………………………


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
UG14N
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना