/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.२: धानोरा तालुक्यातील मुरूमगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेत धान खरेदी करताना ३ कोटीहून अधिक रकमेचा घोटाळा केल्याप्रकरणी पोलिसांनी आणखी चार जणांना अटक केली आहे. यामुळे या प्रकरणातील अटकेतील आरोपींची संख्या आता ७ वर पोहचली आहे.
आदिवासी विकास महामंडाळाच्या धानोरा येथील उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत मुरुमगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेतर्फे २०२०-२१ या खरीप हंगामाकरिता आधारभूत धान खरेदी योजेनेंतर्गत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. त्यानंतर खरेदीही सुरु करण्यात आली. परंतु तपासणीदरम्यान सुमारे ९८७८.९५ क्विंटल धान गोदामात शिल्लक नसल्याचे आढळून आले. या धानाची किंमत ३ कोटी २ लाख रुपये एवढी होती. याप्रकरणी संस्थेचे व्यवस्थापक एल.जी. धारणे, उपप्रादेशिक व्यवस्थापक धीरज चौधरी, प्रतवारीकार तथा प्रभारी विपणन निरीक्षक राहुल कोकडे यांना सबंधित विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र,त्यांनी समाधानकारक खुलासा न दिल्याने उपप्रादेशिक व्यवस्थापक धीरज चौधरी व विपणन निरीक्षक राहुल कोकोडे यांना निलंबित करण्यात आले होते. पुढे तपासणी अधिकारी श्री.बावणे यांनी १८ ऑगस्ट २०२२ रोजी मुरुमगाव पोलिस मदत केंद्रात तक्रार केली. त्यावरुन पोलिसांनी व्यवस्थापक एल.जी.धारणे, केंद्रप्रमुख गुरुदेव धारणे, शंकर कुंभरे, राहुल कोकडे, संस्थेचे अध्यक्ष,संचालक मंडळव अज्ञात व्यापारी यांच्या विरोधात ३१ ऑगस्ट २०२२ ला भादंवि कलम ४२०, ४०६, ४०९, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता.
त्यानंतर पोलिसांनी २५ नोव्हेंबर २०२२ रोजी खरेदी केंद्रपमुख गुरुदेव धारणे याच्यासह अन्य एकास अटक केली.आता १ फेब्रुंवारीला ३ आणि आज एकास अटक करण्यात आली.न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.मुरुमगाव पोलिस मदत केंद्राचे पोलिस अधिकारी जी.एस. आठवे प्रकरणाचा तपास करीत आहेत.