/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.१५: यंदा सतत चार वेळा पुरामुळे पिकाचे नुकसान झाल्याने त्रस्त झालेल्या एका शेतकऱ्याने काल(ता.१४) संध्याकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. बंडू नामदेव चौधरी(४९) रा.मुडझा, ता.गडचिरोली असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
बंडू चौधरी यांना पत्नी, १ मुलगा, १ विवाहित मुलगी आहे. चौधरी यांना चार एकर शेती आहे. परंतु जुलै व ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभी सतत पूर आल्याने त्यांचे धानपीक चार वेळी पुराच्या पाण्यात बुडाले. यामुळे नुकसान कसे भरुन काढायचे या विवंचनेने त्यांना ग्रासले होते. अखेर त्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला शेतातील झाडावर गळफास लावून आत्महत्या केली. गडचिरोली पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.