/* */
रविवार, 4 डिसेंबर 2022
लक्षवेधी :
  गडचिरोली पोलिस ठाण्यातील हवालदार एसीबीच्या जाळ्यात: आरोपीस अटक न करण्यासाठी मागितली साडेतीन हजार रुपयांची लाच             कोरची येथील एसबीआयच्या ग्राहक सेवा केंद्रातून ग्राहकांची ५ लाखांची फसवणूक, दोघांना अटक             अर्थतज्ज्ञ डॉ.श्रीनिवास खांदेवाले यांच्या अध्यक्षतेखालील विदर्भपूरआयोग५ डिसेंबरला गडचिरोलीत: पूरग्रस्तांच्या समस्या जाणून घेणार             गृहकरात केलेली अवाजवी वाढ कमी करा: राष्ट्रवादीचे नेते विजय गोरडवार यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी           

गोंडवाना विद्यापीठ: विद्यापरिषदेच्या निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर

Wednesday, 20th July 2022 06:27:19 AM

गडचिरोली,ता.२०: येथील गोंडवाना विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या निवडणुकीसाठी कुलगुरु डॉ.प्रशांत बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत सोडत काढून विद्या परिषदनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले.

विद्यापीठात ८ विद्याशाखा आहेत. त्यातील एक शाखा महिलेसाठी, तर प्रत्येक विद्याशाखेत दोन प्राध्यापक निवडून द्यावयाचे आहेत. आज काढलेल्या सोडतीनुसार, चार विद्याशाखा खुल्या प्रवर्गासाठी, तर नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग, अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती व भटक्या व विमुक्त प्रवर्गासाठी प्रत्येकी एक विद्याशाखा राखीव झाली आहे. विज्ञान व तंत्रज्ञान ही विद्याशाखा(खुला प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग), वाणिज्य व व्यवस्थापन(खुला प्रवर्ग, अनुसूचित जमाती), मानव विज्ञान(खुला प्रवर्ग, विमुक्त व भटक्या जमाती), आंतरविद्याशास्री(ाय अभ्यास(खुला प्रवर्ग महिला, अनुसूचित जाती) असे हे आरक्षण असणार आहे.

आजच्या बैठकीला प्र-कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे, प्रभारी कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.अनिल चिताडे उपस्थित होते.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
48EFM
  © 2014 - 2022 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना