/* */
सोमवार, 5 जून 2023
लक्षवेधी :
  न्यायाधीशांना धमकी देणारे पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांना अखेर अटक, न्यायालयीन कोठडीत रवानगी             १२ किलो गांजा जप्त, बापलेकांना अटक, मुलचेरा आणि गोंडपिपरी पोलिसांची कारवाई             दहावीच्या निकालात गडचिरोली जिल्हा नागपूर विभागात तिसरा, जिल्ह्याचा निकाल ९२.५२ टक्के, उत्तीर्ण होण्यात मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण अधिक             गाळ उपस्याच्या नावाखाली नदीपात्रातून रेतीचा उपसा, साखरा येथील प्रकार: सरपंचाच्या तक्रारीकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष             राज्यातील ७४ नायब तहसीलदारांना पदोन्नती, गडचिरोली जिल्ह्याला मिळाले ७ नवे तहसीलदार           

शिवसेनेच्या दणक्याने मौशीखांब-मुरमाडी जि. प. क्षेत्रात पावणे चार कोटींची रस्त्यांची कामे मंजूर

Sunday, 8th May 2022 01:59:11 AM

गडचिरोली, ता. ८: तालुक्यातील मौशीखांब - मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील अनेक मुख्य रस्त्यांची फारच दुरवस्था झाली होती.जागोजागी खड्डे पडलेल्या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना वाहनचालक व नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता.  खराब रस्त्यांमुळे अपघाताचे प्रमाण सुध्दा वाढले होते.रस्त्याच्या दुरूस्तीसाठी शिवसेना सहसंपर्क प्रमुख  तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अरविंद कात्रटवार यांच्या नेतृत्वात प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले होते.या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतली असून मौशीखांब -  मुरमाडी जि.प.क्षेत्रात तब्बल ३ कोटी ७१ लाखाची  रस्ता दुरूस्तीची कामे मंजूर करण्यात आली आहेत.

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कार्यालयाच्या वतीने मंजूर करण्यात आलेल्या रस्ता कामांमध्ये दिभना - अमिर्झा - मौशीखांब रस्त्याच्या विशेष दुरूस्तीचा समावेश असून या १३ किमीच्या कामासाठी १ कोटी ७७ लाख ६६ हजाराचा निधी मंजूर करण्यात आला आहे.  उसेगाव - आंबेशिवणी-  गिलगाव या रस्त्याचे सुध्दा काम मंजूर करण्यात आले असून या  ८ किमीच्या कामासाठी १ कोटी ९ लाख २३ हजाराचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याचबरोबर आंबेशिवणी -  भिकारमौशी - मौशीखांब या ६ किमी च्या रस्ता दुरूस्तीसाठी ८४ लाख ७८ हजाराचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.  या क्षेत्रातील मौशीचक ते कातखेडा या रस्त्याच्या  दुरूस्तीचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजना-२ मधून लवकरच मंजूर केले जाणार आहे.
मंजूर रस्त्याची कामे जून २०२२अखेर पूर्ण केले जातील, अशी ग्वाही प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कार्यालयाच्या वतीने शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंद  कात्रटवार यांना माहितीसाठी पाठविलेल्या पत्रकात देण्यात आली आहे.
कोट्यवधी रुपयांची कामे मंजूर झाल्याने या भागातील नागरिकांनी शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिति सदस्य अरविंद कात्रटवार,सहसंपर्क प्रमुख विलास कोडापे,यादव लोहबरे,नवनाथ ऊके,स्वप्निल खांडरे,निकेश लोहबरे,संदीप भुरसे,गणेश दहलाकर,रविंद्र ठाकरे,हिवराज उन्दिरवाड़े,विठ्ठल उन्दिरवाड़े,शांताराम टेम्भूर्ण, केशव मड़ावी,हरिदास सहारे, पंढरी ठाकरे,सोमा ठाकरे,लक्ष्मण निकुरे,लोकचंद ढोने, साहिल निकुरे,दीपक ठाकरे,सचिन निलेकर,अमोल कुमरे,अशोक धनबोले,चुनाराम मुनघाते,हरिदास झरकर,प्रकाश अलबोले,रेमजी मुनघाटे,भजन गेडाम,यशवंत लकुड़वाहे,संदीप ठाकरे,संजय चांग, लालाजी धनकोल्हे,डंबाजी घरमोड़े,दीपक नंनवारे,अनिल दोड़के,मुकरु दोड़के,रमेश कन्नक्के, मनोज मड़ावी,प्रकाश चौधरी, नरेंद्र धारने, विजय जवाड़े,बंडू गेडाम,रमेश टेम्भूर्ण, रवि कुमरे,यशवंत लकुड़वाहे, मनोहर ठोम्बरे, प्रकाश मड़ावी,भाष्कर लोहबरे, युवराज कुलमेठे, घनशाम दोड़के,विष्णु वासेकर,संजय उसेंडी,अनिल आलम,पंकज पिपरे, विनोद तिजारे,यांचे आभार मानले आहेत. 
 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
0390V
  © 2014 - 2023 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना