बुधवार, 26 जानेवारी 2022
लक्षवेधी :
  दुर्गम भागातील नागरिकांनी लोकशाही मूल्ये आणि विकासाला अंगीकारल्याने गडचिरोली जिल्ह्याची परिस्थिती बदलत आहे: प्रजासत्ताकदिन कार्यक्रमात राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे प्रतिपादन             गडचिरोली जिल्ह्यातील ७ पोलिसांना पोलिस शौर्य पदक, तर दोन अधिकाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलिस पदक जाहीर             लसीकरणात गडचिरोली जिल्हयाची ३१ व्या क्रमांकावरून १६ व्या क्रमांकावर झेप-आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी केले अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतूक             गडचिरोलीत राष्ट्रीय मतदार दिवस साजरा, नवमतदारांना जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या हस्ते मतदार ओळखपत्रांचे वाटप             २५ जानेवारी कोरोना अपडेट:गडचिरोली जिल्हयात ४३ जण बाधित, २०१ रुग्ण कोरोनामुक्त           

भाजपने काढला चामोर्शी तहसील कार्यालयावर मोर्चा

Monday, 29th November 2021 07:04:44 AM

गडचिरोली,ता.२९: कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करु नये, धानाला बोनस द्यावा, अवकाळी पावसामुळे पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई द्यावी इत्यादी मागण्यांसाठी आज भारतीय जनता पक्षातर्फे आ.डॉ.देवराव होळी यांच्या नेतृत्वात चामोर्शी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सर्वसामान्य गोरगरीब जनता आणि शेतकऱ्यांची प्रचंड लूट चालवली असल्याची टीका आ.डॉ.देवराव होळी यांनी यावेळी केली. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास आणखी मोठे आंदोलन करण्याचा इशाराही आ.डॉ.होळी यांनी दिला. या आंदोलनात भाजपचे तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य स्वप्निल वरघंटे, भाजपचे जिल्हा सचिव आनंद गण्यारपवार , बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, पंचायत समितीचे सभापती भाऊराव डोर्लीकर, उपसभापती वंदना गौरकर,ओबीसी आघाडीचे महामंत्री भास्कर भुरे, आशिष पिपरे, चामोर्शी तालुका महामंत्री साईनाथ बुरांडे, तालुका महामंत्री संजय खेडेकर, भाजपा पदाधिकारी भाऊराव भगत, अतुल शिरपूरकर, बंगाली आघाडीचे नेते सुशांत रॉय, अनिता रॉय, भाजपाचे ज्येष्ठ नेते जयराम चलाख, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष प्रतीक राठी, जिल्हा कार्यकारणी सदस्य नीरज रामानुजवार, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष नरेश अल्सावार, ग्रामपंचायत सदस्य संजय चलाख, किशोर गटकोजवार, प्रशांत पालरपवार, लक्ष्मण वासेकर,विकास मैत्र,राजू वरघंटीवार, भाऊजी दहेलकर, वासुदेव चिचघरे, विनोद किरमे यांच्यासह तालुक्यातील शेतकरी, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
54UU0
  © 2014 - 2022 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना