शनिवार, 27 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

हिवाळी अधिवेशनात सरकारला धारेवर धरणार

Thursday, 4th December 2014 06:34:26 AM

 

गडचिरोली, ता़४

शेतमालाला रास्त भाव, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, दलितांवरील अत्याचार, ओबीसी आरक्षण, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती व अन्य मुद्यांवर येत्या ८ तारखेपासून सुरू होणाºया विधिमंडळ अधिवेशनात सरकारला धारेवर धरणार असल्याची माहिती ब्रम्हपुरीचे आमदार व काँग्रेसचे विधिमंडळातील उप गटनेते विजय वडेट्टीवार यांनी  दिली़

आज ४ डिसेंबर रोजी गडचिरोली येथील आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली़ यावेळी माजी नगराध्यक्ष अ‍ॅड़ राम मेश्राम उपस्थित होते़ आ़ वडेट्टीवार यांनी सांगितले की, संपूर्ण मराठवाडा दुष्काळाच्या छायेत असून, तेथे पेयजलाची भीषण टंचाई आहे़ मोदी सरकार आल्यापासून महाराष्ट्रात ५६८ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या, तर राज्यात फडणवीस सरकार आल्यानंतर महिनाभरात ११८ शेतकर्‍यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे़ शेतमालाला योग्य भाव दिला जात नाही़ कापूस, सोयाबीन व धान उत्पादक शेतकरी प्रचंड संकटात आहे़ आघाडी सरकारच्या काळापेक्षा यंदा धानाला ४०० ते ५०० रुपये कमी भाव मिळत आहे, अशी टीका करून आ़ वडेट्टीवार यांनी पंतप्रधानांची यवतमाळच्या सभेतील कापसाला प्रतिक्विंटल भाव देण्याची घोषणा कुठे विरली, असा सवाल केला़  दुष्काळी भागातील कोरडवाहू शेतकर्‍यांना २५ हजार, तर बागायती शेतकर्‍यांना हेक्टरी ५० हजारांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली़ 

गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करावे, ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीतील अडथळे तत्काळ दूर करावेत, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेश द्यावे इत्यादी मागण्यांसंदर्भात विधिमंडळात आवाज उठविणार असून, वडसा-गडचिरोली लोहमार्गासाठी द्यावयाच्या ५० टक्के रकमेची राज्य सरकारला आठवण करून देऊ, असेही ते म्हणाले़ गोसीखुर्द प्रकल्पाला अजूनही ६ हजार कोटींची आवश्यकता असून, केंद्र सरकारकडून निधी मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावे, असे वडेट्टीवार म्हणाले़ पेसा क्षेत्रातील गावे वगळून गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींना आरक्षण देण्याचा मुख्यमंत्र्यांचा विचार ही ओबीसींची दिशाभूल असून, राज्य सरकारच्या १० मंत्र्यांपैकी एकही मंत्री ओबीसी नसल्याची घणाघाती टीका आ़ विजय वडेट्टीवार यांनी केली़


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
IK9UH
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना