शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

नक्षल्यांनी केली माजी उपसरपंचाची हत्या

Monday, 30th March 2020 12:15:28 AM

नंदकिशोर वैरागडे/कोरची,ता.३०: पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी काल(ता.२९) रात्री कोरची तालुक्यातील नवेझरी येथील एका इसमाची हत्या केली. हिरालाल रामसाय कल्लो(४०) असे मृत इसमाचे नाव असून, ते नवेझरी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच होते. रात्री काही नक्षली गावात आले होते. त्यांनी हिरालालला गावाबाहेर नेऊन त्याची हत्या केली. आज सकाळी गावकऱ्यांना हिरालालचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाशेजारी नक्षल्यांनी पत्रकही टाकले होते. त्यात हिरालाल पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप नक्षल्यांनी केला आहे. हे कृत्य कोरची दलमने केल्याचा अंदाज आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
4T0H6
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना