शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

अनावश्यक खर्च टाळून प्रेमीयुगुलाने केला आदर्श विवाह

Wednesday, 18th March 2020 06:59:48 AM

कुरखेडा,ता.१८: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर, एका प्रेमीयुगुलाने अनावश्यक खर्चाला फाटा देत अत्यंत साध्या पद्धतीने आपला विवाह पार पाडला. गुरुदेव सेवा मंडळाने त्यासाठी पुढाकार घेतला..

कुरखेडा तालुक्यातील चिचटोला येथील पुरुषोत्तम हरिदास नैताम(२४) व कोरची तालूक्यातील कोचीनारा येथील राधिका ओझाराम जमकातन (२२) या दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले. दोघांनीही कुटुंबीयांच्या सहमतीने विवाह करण्याचा निर्णय घेतला. १५ ते २२ मार्च या कालावधीत कुरखेडा येथे आयोजित भागवत सप्ताहात त्यांचा विवाह होणार होता. परंतु कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी भागवत सप्ताह पुढे ढकलण्यात आला. त्यामुळे प्रेमीयुगुलाने गुरुदेव सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांच्या पुढाकाराने मंडळाच्या सभागृहात निवडक नागरिकांच्या उपस्थितीत पारपंरिक हिंदू विवाह पद्धतीने दोघांचा विवाह पार पडला.

यावेळी तन्नूप्रसाद दुबे यानी मंत्रोच्चार व धार्मिक विधी करीत विवाह पार पाडला याप्रसंगी गुरूदेव सेवा मंडळाच्या अध्यक्ष सुधा नाकाडे, सचिव चरणदास कवाडकर, सदाशिव ब्राम्हणवाडे, अविनाश दुबे,जिल्हा परिषदेच्या माजी सभापती निरांजनी चंदेल,माजी जिल्हा परिषद सदस्य आशा कुमरे, आशा बानबले, ओमकार ठलाल तसेच दोघांचेही कुटुंबीय व गावकरी उपस्थित होते.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
08N6V
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना