शनिवार, 27 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

बालिकेवर अतिप्रसंग करणाऱ्यास १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

Thursday, 27th February 2020 06:59:54 AM

गडचिरोली,ता.२७: घरी कुणीच नसल्याची संधी साधून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्या आरोपीस येथील विशेष सत्र न्यायालयाने १० वर्षे सश्रम कारावास व ५१ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. मनोहर टिकाराम कापगते(४३),रा.पलसगड,ता.कुरखेडा असे दोषी इसमाचे नाव आहे.

ही घटना आहे २८ ऑक्टोबर २०१७ ची. घटनेच्या दिवशी दुपारी पीडित मुलगी घरी एकटीच असताना मनोहर कापगते हा तिच्या घरी गेला. त्यानंतर त्याने पीडितेवर अतिप्रसंग केला. काही वेळाने पीडित मुलीचा मामा घरी येताच आरोपी मनोहर कापगते याने तेथून पळ काढला. पीडितेने आपबिती सांगितल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी पुराडा पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यावरुन पोलिसांनी मनोहर कापगते याच्यावर भादंवि कलम ३७६(२)(आय), ५०६, ४४८ व बाल लैंगिक अत्याचार अधिनियमान्वये गुन्हा दाखल करुन २९ ऑक्टोबर २०१७ ला त्यास अटक केली. पोलिस उपनिरीक्षक सुखदेव गोदे यांनी तपास पूर्ण केल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

आज या प्रकरणाचा निकाल लागला. विशेष सत्र न्यायालयाने सर्व साक्षदारांचे बयाण नोंदवून व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपी मनोहर कापगते यास १० वर्षांचा सश्रम कारावास व ५१ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाच्या रकमेपैकी ४५ हजार रुपये पीडित मुलीला भरपाई म्हणून देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला.

सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल प्रधान यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक पी.के.तुनकलवार यांनी जबाबदारी सांभाळली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
3A4HK
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना