शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात दोन गावांत आधार प्रमाणीकरणास प्रारंभ

Monday, 24th February 2020 06:39:21 AM

गडचिरोली,ता.२४: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील देसाईगंज व लखमापूर बोरी (ता.चामोर्शी) येथील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणीकरण करून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

राज्यस्तरावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पहिली यादी प्रसिध्द करण्यात आली. यानंतर लगेच गडचिरोली जिल्हयातील दोन गावांमध्ये पथदर्शी स्वरूपात यादी सार्वजनिक करून आधार प्रमाणीकरणास सुरूवात झाली. यावेळी जिल्हयातील पहिले आधार प्रमाणिकरण चामोर्शी तालुक्यातील सखुबाई लहूजी सातपुते यांचे झाले. त्यांनी यावेळी कर्ज स्वरूपातील रक्कम पडताळून ऑनलाईन सहमती दिली. दुसरे प्रमाणीकरण देसाईगंज येथील नंदू नरोटे यांचे करण्यात आले.

पथदर्शी स्वरूपात प्रसिद्ध झालेल्या दोन गावांमध्ये प्रथम यादीत २९१ लाभार्थींची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीतील लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण आपले सरकार सेवा केंद्र किंवा नागरीक सुविधा केंद्र किंवा गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत जावून करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी यावेळी केले. उर्वरीत सर्व लाभार्थींची यादी २८ फेब्रुवारीपर्यंत प्रसिध्द केली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे म्हणाले.  जिल्ह्यातील १६ हजार २३८ थकबाकीदार शेतकरी सभासदांची जवळपास ८३.७५ कोटी रूपयांची कर्जमाफी होऊन हे शेतकरी कर्जमुक्त होतील, असे जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांनी सांगितले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
LK6H0
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना