शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

बांधकाम समिती युद्धिष्ठिर बिस्वास, तर कृषी व पशुसंवर्धन समिती रमेश बारसागडेंकडे

Monday, 27th January 2020 08:05:56 AM

गडचिरोली,ता.२७: जिल्हापरिषदेच्या सर्वसाधारण सभेत आजदोन सभापतींना  बांधकाम आणि कृषी व पशुसंवर्धन समिती या समित्यांचे खातेवाटप जाहीर करण्यात आले. बांधकाम समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे युद्धिष्ठिर बिस्वास, तर कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापतिपदी भाजपचे प्रा.रमेश बारसागडे यांची निवड करण्यात आली.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपाध्यक्ष मनोहर पोरेटी यांच्यासह सर्व जिल्हा परिषद सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते. या सभेत बांधकाम समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे युद्धिष्ठिर बिस्वास, तर कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापतिपदी भाजपचे प्रा.रमेश बारसागडे यांची वर्णी लागली. आरोग्‌य व शिक्षण या दोन समित्यांचा कार्यभार उपाध्यक्ष मनोहर पोरेटी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

३ जानेवारीला झालेल्या निवडणुकीत काँग्रेस-आविस आघाडीचे अजय कंकडालवार अध्यक्ष तर मनोहर पोरटी उपाध्यक्ष झाले. परंतु १६ जानेवारीला पार पडलेल्या निवडणुकीत चार समित्यांवर भाजप-राकाँ युतीचे सदस्य निवडून आले. समाजकल्याण सभापतिपदावर भाजपच्या रंजिता कोडापे, तर महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदावर रोशनी पारधी विजयी झाल्या होत्या., उर्वरित दोन समित्यांच्या सभापतिपदांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युद्धिष्ठिर बिस्वास व भाजपचे प्रा.रमेश बारसागडे निवडून आले होते. या दोघांनाही आजच्या सर्वसाधारण सभेत खातेवाटप जाहीर करण्यात आले. दरम्यान, रंजिता कोडापे व रोशनी पारधी यांनी अनुक्रमे समाजकल्याण आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदांचा पदभार स्वीकारला. भाजप-राकाँ सदस्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
RH45C
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना