शनिवार, 27 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला वैकुंठभाई मेहता पुरस्कार जाहीर

Tuesday, 21st January 2020 08:19:06 AM

गडचिरोली,ता.२१: महाराष्ट राज्य सहकारी बँक्स असोसिएशन मुंबईतर्फे दिला जाणारा २०१८-१९ या वर्षीचा प्रतिष्ठेचा वैकुंठभाई मेहता उत्कृष्ठ जिल्हा सहकारी बँक राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जाहीर झाला आहे..गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सलग सातव्यांदा हा पुरस्कार मिळाला आहे..

१० फेब्रुवारीला मुंबई येथील रवींद्र नाट्य मंदिरात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे..

हा पुरस्कार रिझर्व्ह बँक व नाबार्ड यांच्या आर्थिक निकषावर जाहीर होत असतो. सातारा जिल्हा सहकारी बँकेने द्वितीय, तर सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेने तृतीय पुरस्कार पटकावला आहे. जिल्ह्यात दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ५५ शाखा असून,. ४ लाख ३० हजार ग्राहकांना बँकिंग सेवा दिली जात आहे. बँकेकडे आजमितीस १ हजार ७५० कोटीच्या ठेवी असून, ३ हजार कोटीच्या व्यवसायाकडे बँकेची वाटचाल सुरु आहे. बँकेने ९९० कोटी  रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँकेचा ग्रॉस  एनपीए. १.३० टक्के असून नेट एनपीए. शून्य टक्के आहे. महाराष्टातील जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये सर्वात कमी ग्रॉस एनपीए. असणारी गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे.

बँकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन बँकेच्या सर्व शाखा सीबीएस प्रणालीवर मुख्य कार्यालयाशी जोडलेल्या आहेत. जिल्ह्यात बँकेचे ३०एटीएम कार्यरत असून ग्राहकांना अत्याधुनिक सुविधा पुरविली जात आहे. बँकेने नुकतेच ग्राहकांना मोबाईल बँकिंग, आयएमपीएससारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे.

गडचिरोली जीडीसी बँकेला पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जिल्ह्यातील शेतकरी वर्ग, ठेवीदार, पगारदार कर्मचारी, व्यापारी, सहकारी संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, बचत गट, ग्राहक व हितचिंतक यांचे बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, मानद सचिव अनंत साळवे, बँकेचे सर्व संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार, बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी आभार मानले आहेत. 

    


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
ATU59
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना