शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

गडचिरोली जिल्हा परिषदेचे चार सदस्य अपघातात जखमी

Friday, 17th January 2020 12:06:41 AM

कुरखेडा,ता.१६: गडचिरोली जिल्हा परिषदेचे चार सदस्य कार अपघातात गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास कुरखेड्यापासून १० किलोमीटर अंतरावरील लेंढारी गावाजवळच्या वळणावर घडली.

नामदेव सोनटक्के, भाग्‌यवान टेकाम, रमाकांत ठेंगरी व संपत आळे अशी जखमी सदस्यांची नावे आहेत. आज गडचिरोली जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतिपदांची निवडणूक आहे. त्यासाठी अनेक सदस्य गावाबाहेर होते. उपरोक्त चारही सदस्य काल देवरी येथे मुक्कामी होते. आज सकाळी ते देवरीहून कारने गडचिरोलीला जाण्यासाठी निघाले. परंतु लेंढारी गावाजवळ कारने रस्त्याच्या कडेला उभ्‌या असलेल्या ट्रकला जबर धडक दिली. यात चौघेही जखमी झाले. नामदेव सोनटक्के व भाग्‌यवान टेकाम यांच्या उजव्या पायाचे हाड मोडले आहे, तर ठेंगरी व आळे यांनाही गंभीर दुखापत झाली आहे. चौघांनाही रुग्णवाहिकेने कुरखेडा येथे आणून उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
600LP
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना