शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020
लक्षवेधी :
  बालिकेवर अतिप्रसंग करणाऱ्यास १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा- विशेष सत्र न्यायालयाचा निवाडा             कार अपघातात प्रा.कालिदास टिकले व प्रा. विद्या टिकले हे शिक्षक दाम्पत्य ठार, कुरखेडा-देसाईगंज मार्गावरील कसारी फाट्यानजीकची घटना             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

वंचित बहुजन आघाडीने काढला गडचिरोली नगर परिषदेवर लक्षवेधी मोर्चा

Friday, 10th January 2020 01:38:34 PM


गडचिरोली, ता.१०शहरातील जनतेला  भेडसावणाऱ्या  समस्यांकडे पदाधिकारी वप्रशासनाचे  लक्ष  वेधून  घेण्यासाठी  वंचित  बहुजन  आघाडीच्या  वतीने  आज  नगर परिषद कार्यालयावर लक्षवेधी मोर्चा काढण्यात आला.

भारिप  बहुजन  महासंघाचे  (दक्षिण)  जिल्हाध्यक्ष  बाळू  टेंभुर्णे  वंचित   बहुजन  आघाडीचे  जिल्हाध्यक्ष  गजानन  कुकुडकर,  भारिप  बहुजन  महासंघाचे (उत्तर)  जिल्हाध्यक्ष  प्रा. हंसराज  बडोले, सल्लागार   जी.   के.  बारसिंगे,   महिला  आघाडीच्या   जिल्हाध्यक्ष  माला  भजगवळी,  जिल्हा  उपाध्यक्ष  नरेश  महाडोळे,  जिल्हा  सचिव  योगेंद्र  बांगरे,  ज्येष्ठ  नेते  पत्रूजी  टेंभुर्णे,  युवा  नेते  गुलाब  मुगल,  जिल्हा  महासचिव  डाकराम  वाघमारे,  जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र बांबोळेजिल्हा संघटक धर्मेंद्र गोवर्धनजिल्हा उपाध्यक्ष डॉयोगेश नंदेश्वरमहिला  आघाडीच्या  नेत्या  सीमा  दुर्गेज्योती  जनबंधू,  ज्योती  दहिकर,  गीता  भोयररंजना  तागडे,  वैशाली  चुधरी,  अनिल  राऊत,  डीकेजांभुळकर,  अनिल  निकुरे,  भोजू रामटेके आदींनीयामोर्चाचेनेतृत्वकेले.

गोकुळनगरचनकाईनगरविवेकानंदनगर रामनगरइंदिरानगरलांझेडा येथे अतिक्रमण करुन वास्तव्य करणाऱ्या  नागरिकांना  तत्काळ  जमिनीचे  पट्टे  द्यावे,वर्षांपासून  रखडलेली  घरकुल  योजना  त्वरित  कार्यान्वित  करावी,  ३५  वर्षांपूर्वी  घरकुल  योजनेचा  लाभ  घेणाऱ्यांचे  घरकुल  जीर्ण झाले  असून, त्यांना  विनाअट  घरकुल  मंजूर  करावे,  वाढीव  गृहकर   पाणीपट्टी  रद्द  करावे,  मागील  २०  वर्षांपासून  साफसफाईचे  काम  करणाऱ्या  कामगारांना  शासकीय  सेवेत  सामावून  घ्यावे,  भूमिगत  गटारलाईनच्या  कामाची  सीबीआयमार्फत  चौकशी  करुन  दोषींवर  कारवाई  करावी   अन्य विविध प्रकारच्या १७ मागण्यांसाठी  हा मोर्चा काढण्यात  आला.

दुपारी  साडेबारा  वाजता  चामोर्शी  मार्गावरील  पेपरमिल  कार्यालयापासून  मोर्चाची सुरुवात झाली. त्यानंतर प्रमुख मार्गाने मोर्चा नगर परिषद कार्यालयावर नेण्यात आला. तेथे पोहचल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले.

  


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
S4N4L
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना