शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

साधना विद्यालयात बालकांसह पालकांनाही मिळाली सांस्कृतिक मेजवानी

Saturday, 21st December 2019 08:04:53 AM

गडचिरोली,ता.२१: पद्मश्री डॉ.प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पाद्वारे संचालित नेलगुंडा येथील साधना विद्यालयात आज विद्यार्थी व पालकांसाठी ‘ओपन डे’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हेमलकसा येथील लोकबिरादरी विद्यालयाच्या विद्यार्थ्यानी व्यसनमुक्ती व कुर्मा घर या दोन समस्यांवर पथनाट्य सादर करुन जनजागृती केली.

पद्मश्री डॉ.प्रकाश आमटे व डॉ. सौ. मंदाताई आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पाने भामरागड तालुक्यातील नेलगुंडा या अतिदुर्गम गावात ५ मे २०१५ रोजी साधना विद्यालय ही इंग्रजी माध्यमाची शाळा खास लोक आग्रहास्तव सुरु केली. या शाळेत ११ गावांतील १३१ आदिवासी विद्यार्थी बालवाडी ते ५ वीपर्यंतचे शिक्षण घेत आहेत. आज हे विद्यार्थी, पालक व गावकऱ्यांसाठी ओपन डे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी भामरागड येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी मनुज जिंदल(आयएएस) व अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्ष्क डॉ.कन्ना मडावी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. शाळेचे संचालक अनिकेत आमटे व समीक्षा आमटे यांनी शाळेविषयी माहिती दिली. याप्रसंगी पाचवीच्या विद्यार्थ्यांनी मनुज जिंदल यांच्याशी चक्क इंग्रजीतून संवाद साधला. माडिया जमातीची मुलं इंग्रजी बोलत असल्याचे बघून श्री.जिंदल यांनी त्यांचे कौतुक केले. पालक व गावकऱ्यांनीही विविध खेळांमध्ये सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे गावकऱ्यांना मनोरंजनाची मेजवानी दिली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
E0X9S
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना