शनिवार, 27 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

महावितरण दररोज घेणार अधिकार्‍यांची झाडाझडती

Friday, 21st November 2014 12:54:07 AM

 

गडचिरोली, ता.२१

कृषिपंपांचे रोहित्र जळण्याचे प्रकार वाढत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आता महावितरणने मुख्यालयातून दररोज झाडाझडती घेणे सुरू केले आहे़ वीजचोरीमुळे अतिरिक्त भार पडत असल्यानेच रोहित्र जळत असून रोहित्र जळण्याचे प्रमाण नियंत्रणात राहावे, म्हणून दररोज अहवाल पाठविण्याचे निर्देश क्षेत्रिय कार्यालयांना देण्यात आले आहेत़

शेतीला सिंचनाची सोय व्हावी, यासाठी शासनाने शेतकर्‍यांना रोहित्र देण्याची योजना आखली असली, तरी हे रोहित्रच मोठ्या प्रमाणावर जळत असल्याचे निदर्शनास येत आहे़ मुळात रोहित्र अतिभारीत असल्याशिवाय जळत नाही़ विजेचा अनधिकृत वापर किंवा मंजूर भारापेक्षा जास्त क्षमतेच्या मोटारींचा वापर या कारणांमुळे रोहित्र अतिभारीत होऊन जळतात़ यावर नियंत्रण आणण्यासाठी अनधिकृत वापरावर वीजचोरीची कारवाई करावी, वीजचोरी थांबविल्याशिवाय रोहित्र देऊ नये, अशा सूचना महावितरणने यापूर्वीच जारी करण्यात आल्या आहेत़

यात संबंधितांची जबाबदारी निश्चित करता यावी यासाठी महावितरण मुख्यालयाने ज्या भागात रोहित्र जळाले आहे; ते गाव, उपविभाग, उपविभागाचे प्रमुख व रोहित्राची जबाबदारी असलेल्या लाईनमनचे नाव याबाबतचा रोहित्रनिहाय तपशील दररोज मुख्यालयात पाठविण्याच्या सूचना क्षेत्रिय कार्यालयांना दिल्या आहेत़

राज्यात महावितरणच्या अखत्यारितील ४६ मंडळांमध्ये सुमारे २ लाख ३६ हजार रोहित्रांद्वारे कृषिपंपांना वीजपुरवठा केला जातो़ यापैकी विजेची अतिहानी असलेल्या १० मंडळांमध्ये सुमारे १ लाखांहून अधिक रोहित्रे आहेत़ याच भागात रोहित्रे जळण्याचे प्रमाणही अधिक आहे़ रोहित्र जळण्याचे प्रमाण अधिक असलेल्या मंडळांमध्ये वाशिम, हिंगोली, बीड, जालना, औरंगाबाद, नंदूरबार,अहमदनगर, नाशिक ग्रामीण, बुलढाणा व अकोला यांचा समावेश आहे़ विशेष म्हणजे, या मंडळांमध्ये अतिभारामुळे बदललेले रोहित्रही पुन्हापुन्हा जळण्याचे प्रमाण जास्त आहे़

डिसेंबर २०१२ मध्ये राज्य भारनियमनमुक्त झाले़ तरीही उपरोक्त १० मंडळांतील वाहिन्यांवर वितरण व वाणिज्यिक हानीचे प्रमाण जास्त असल्याने भारनियमनात असलेल्या वाहिन्यांचे प्रमाणही जास्त आहे़ या वाहिन्यांवर कृषिपंपांचा अनधिकृत वीजवापर, मंजूर भारापेक्षा जास्त क्षमतेच्या कृषिपंंपांचा वापर यामुळे रोहित्र अतिभारीत होतात आणि जळतात़ यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आता महावितरण दररोज क्षेत्रिय कार्यालयांमूधन अहवाल मागविणार असून, संबंधित अधिकार्‍यांची झाडाझडती घेणार आहे़


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
C340R
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना