सोमवार, 16 डिसेंबर 2019
लक्षवेधी :
  तेली समाजाने संघटित होऊन ताकद दाखवून द्यावी-गडचिरोली येथील तेली समाजाच्या मेळाव्यात खा.रामदास तडस यांचे आवाहन             देसाईगंज येथील राष्ट्रीय लोक अदालतीत ६३ प्रकरणांचा निपटारा             गडचिरोलीच्या ८ विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय योग स्पर्धेकरिता निवड             महावितरणला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचा दणका-वीज चोरीच्या आरोपावरुन ग्राहकास पाठविलेले अतिरिक्त बिल व दंड रद्द करण्याचे आदेश             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

चामोर्शीच्या पीएसआयसह हवालदार एसीबीच्या जाळ्यात

Thursday, 24th October 2019 02:50:25 PM

 

गडचिरोली,ता.२४: दारुविक्रेत्या महिलेकडून दारु जप्त केल्यानंतर दारुविक्रीचा गुन्हा नोंद न करण्यासाठी तिच्याकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्या चामोर्शी पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकासह एका हवालदारास रंगेहाथ पकडून अटक केली. दिनेशकुमार लिल्लारे(३४) असे पोलिस उपनिरीक्षकाचे, तर चंद्रशेखर काकडे(४८) असे अटक केलेल्या हवालदाराचे नाव आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्त्या महिलेकडून मोहफुलांची १० लीटर दारु जप्त केल्यानंतर गुन्हा नोंद न करण्यासाठी पीएसआय लिल्लारे व हवालदार काकडे यांनी तिला १० हजार रुपयांची लाच मागितली. परंतु लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने तिने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार या विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज चामोर्शी पोलिस ठाणे परिसरात सापळा रचून पीएसआय दिनेशकुमार लिल्लारे व हवालदार चंद्रशेखर काकडे यांना पंचांसमक्ष १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडून अटक केली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
5CI41
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना