रविवार, 20 ऑक्टोबर 2019
लक्षवेधी :
  लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्याटक्केवारीचा विक्रम पार करणार: जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी व्यक्त केला विश्वास             प्रचारतोफा थंडावल्या; गुप्त प्रचारात गुंतले उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते             मतविभाजन टाळण्यासाठी पुरोगामी राजकीय पक्ष व संघटनांनी शेकापला मदत करावी-शेकापचे जिल्हा चिटणीस रामदास जराते यांचे आवाहन             विधानसभा निवडणूक: गडचिरोली जिल्ह्यातील ४७० गावांमध्ये दारुमुक्त निवडणुकीचे ठराव, नवऱ्याला दारु पाजणाऱ्या उमेदवारास पाडण्याचा महिलांचा निर्धार             आदिवासींनीच केंद्रातील सरकार व मोदींना पंतप्रधान बनवलं-आलापल्ली येथील प्रचार सभेत भाजपाध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

भाजपाची स्थापना जनसेवेसाठीच: किशन नागदेवे

Tuesday, 8th October 2019 12:47:30 PM

कुरखेडा,ता.८:   भाजपाची स्थापना सत्तेसाठी नाही,तर जनसेवेसाठी झाल्याचे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे यांनी सोमवारी सायंकाळी कुरखेडा येथे केले.

येत्या २१ तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना व रिपाइं महायुतीचे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे  उमेदवार आमदार कृष्णा गजबे यांच्या कुरखेडा येथील पहिल्या प्रचार कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देत श्री.नागदेवे यांनी भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता बूथवरचा योद्धा आहे, तर उमेदवार हा प्रतिनिधी असल्याचे सांगितले. कार्यकर्त्यांनी स्वतः ला उमेदवार समजून प्रचार करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार महर्षी  प्रकाश सावकार पोरेड्डीवार होते याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून,जिल्हा उपाध्यक्ष गणपत सोनकुसरे, जिल्हासचिव  विलास गावंडे, तालुकाध्यक्ष राम लांजेवार, कृषी सभापती नाना नाकाडे, जिप सदस्य भाग्यवान टेकाम, नाजूक  पुराम शिवसेनेचे तालुका प्रमुख हेमंत लांजेवार, नितेश देशमुख ,नगरसेवक बबलूभाई हुसैनी, पुंडलिक देशमुख, अॅड. उमेश वालदे ,खेमनाथ  डोंगरवार, वसंतराव मेश्राम यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष चांगदेव फाये यांनी केले. प्रभारी नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे यांनी आभार मानले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
E508Q
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना