शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

अडपल्लीत भीक मागणार्‍या मुलाचा बोडीत बुडून मृत्यू

Saturday, 15th November 2014 04:41:19 AM

 
गडचिरोली, ता़१५ 
घरोघरी भीक मागून पोटाची खळगी भरणार्‍या एका ७ वर्षीय मुलाचा बोडीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आज १५ नोव्हेंबरच्या सकाळी मुलचेरा तालुक्यातील अडपल्ली येथे उघडकीस आली़ मुलाची ओळख पटलेली नाही़
आज सकाळी एक इसम गावाबाहेर शौचास गेला असता त्यास ग्रामीण रुग्णालयामागे असलेल्या बोडीत एक मृतदेह तरंगताना दिसला़ घटनेची माहिती मिळताच गावकर्‍यांनी घटनास्थळी गर्दी केली़ त्यानंतर घोट पोलिस मदत केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक श्रीक़वडे यांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाचा पंचनामा केला़ त्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी पाठविण्यात आला़


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
12LZ1
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना