शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

वडसा रेल्वेस्थानकावर दरभंगा एक्सप्रेसला थांबा मंजूर

Friday, 13th September 2019 07:31:49 AM

गडचिरोली, ता.१३ :  जिल्ह्यातील एकमेव वडसा रेल्वे स्थानकावर दरभंगा एक्सप्रेसचा थांबा देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती. खासदार अशोक नेते यांनी यासाठी सतत प्रयत्न केल्याने केंद्रीय रेल्वे बोर्डाने वडसा रेल्वेस्थानकावर दरभंगा एक्सप्रेसला थांबा मंजूर केला आहे.

१४  सप्टेंबरला दुपारी १२.३८ वाजता  दरभंगा एक्स्प्रेस वडसा रेल्वे स्थानकावर येणार असून, भाजपाच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे. दरभंगा एक्सप्रेस सिकंदराबाद ( हैद्राबाद) वरून सुटत असून दरभंगा ( बिहार) कडे जाते. गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्रातील नागरिकांनी दरभंगा एक्स्प्रेसचा थांबा वडसा , नागभीड व आमगाव येथे देण्याची मागणी खासदार अशोक नेते यांच्याकडे केली होती. नागरिकांच्या मागणीची दखल घेत खासदार अशोक नेते यांनी ३ वर्षापूर्वी  दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या बिलासपूर झोन व नागपूर झोन च्या वरीष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावुन  तिन्ही ठिकाणी दरभंगा एक्सप्रेस चा थांबा देण्यासाठी उचित निर्णय घेण्याचे सुचविले होते . तसेच हा प्रश्न मार्गी लागत नसल्याने खासदार अशोक नेते यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्याकडे ही मागणी रेटून धरली व लोकसभेत शून्यकालमध्ये हा प्रश्न लावून धरला होता. आज खासदार अशोक नेते यांच्या निरंतर पाठपुराव्याला  यश आले असून केंद्रीय रेल्वे बोर्डाने  आज १३ सप्टेंबर रोजी  दरभंगा एक्सप्रेसचा वडसा येथे थांबा मंजूर केला आहे. थांबा मंजूर केल्याबद्दल नागरिकांनी खासदार अशोक नेते यांचे आभार मानले आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
J4Y4M
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना