शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

कुरखेड्याचे प्रा.डॉ.अभय सोळुंके केंद्र सरकारच्या वैज्ञानिक सल्लागार मंडळावर

Wednesday, 11th September 2019 07:26:57 AM

गडचिरोली, ता.११: कुरखेडा येथील श्री.गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अभय सोळुंके यांची केंद्र सरकारच्या वैज्ञानिक सल्लागार मंडळावर निवड करण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या औद्योगिक नीती व संवर्धन विभाग, उद्योग व वाणिज्य मंत्रालय यांच्या एकस्व व अभिकल्प तसेच व्यापारचिन्ह या विभागात बौद्धिक कायदा २००३ च्या कलम १०३ अन्वये जैव तंत्रज्ञान व सुक्ष्मजीव शाखेतून डॉ.सोळुंके यांची निवड करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने वैज्ञानिक सल्लागार म्हणून रसायनशास्त्राशी संबंधित विषयासाठी १५, जैवतंत्रज्ञान व सुक्ष्मजीवशास्त्र ८, मेकॅनिक ४ व इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रानिक्स या विषयातून १० अशा चार गटांतून ३७ जणांची देशभरातून निवड केली आहे. त्यापैकी जैवतंत्रज्ञान व सुक्ष्मजीवशास्त्र

या गटात डॉ.सोळुंके यांची निवड करण्यात आली आहे. सध्या डॉ.सोळुंके हे गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या बौद्धिक संपदा मंडळाचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत.

श्री.गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य तथा संस्थेचे अध्यक्ष डॉ.राजाभाऊ मुनघाटे हे युनोस्कोच्या आशिया खंडातील उच्च शिक्षणातील गुणवत्ता निर्धारण मंडळाचे सदस्य असून, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली डॉ.सोळुंके यांनी वर्षभरापूर्वी पेटंट सादर केले होते. या पेटंटची निवड झाल्याने डॉ.सोळुंके यांनी वैज्ञानिक सल्लागार मंडळावर वर्णी लागली आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
AS5SZ
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना