शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

दोन जण पुरात वाहून गेले

Friday, 6th September 2019 07:38:53 AM

गडचिरोली,ता.६: अतिवृ्‌ष्टीमुळे आलेल्या पुरात दोन नागरिक वाहून गेले आहेत,तर ठाणेगाव येथील २५, चामोर्शी येथील १६ व अरततोंडी येथील शंभर जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आपत्ती व्यवस्थापन विभागाची चमू व पोलिसांना यश आले आहे.

धानोरा तालुक्यातील निमगाव येथील रामदास मादगू उसेंडी  आरमोरी तालुक्यातील  मेंढा येथील नाल्याच्या पुरात  आज सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास वाहून गेला, तर चामोर्शी तालुक्यातील पाविलसनपेठा येथील सुधाकर पोटावी हा इसम पोरनदीत वाहून गेल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव येथील २५ नागरिक पुरात अडकले होते. तसेच चामोर्शी माल येथील पुरात अडकलेल्या १६ जणांना आपत्ती व्यवस्थापन विभाग व पोलिसांनी बोटीद्वारे सुरक्षितरित्या बाहेर काढले. हे सर्व जण छत्तीसगड राज्यातील पाखांजूर व दुर्ग तालुक्यातील येथील रहिवासी आहेत.

कुरखेडा तालुक्यातील जुनी अरततोंडी येथील शंभर नागरिकांना सकाळी सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले, तर अन्य शंभर जणांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

गोसेखुर्द धरणाचे १९दरवाजे दीडमीटरने, तर १४ दरवाजे १ मीटरनेउघडण्यात आले असून, त्यातून ९२३४क्यूमेक्स पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा पूर परिस्थिती भयावह होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील तब्बल १७ मार्ग बंद असल्याने हजारो गावांचा संपर्क तुटला आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
4X0RR
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना