शनिवार, 27 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

पुलावरुन पडून पुरात वाहून गेला इसम

Monday, 12th August 2019 06:20:10 AM

गडचिरोली, ता.१२: मोटारसायकलने जात असताना तोल गेल्याने एक इसम खोब्रागडी नदीत पडून वाहून गेल्याची घटना आज सकाळी घडली. गोवर्धन भगवान रामटेके, रा.चुरमुरा असे मृत इसमाचे नाव आहे.

आज सकाळी गोवर्धन रामटेके हा आरमोरी येथून मोटारसायकलने आपल्या चुरमुरा गावाकडे जात होता. वाटेत असलेल्या खोब्रागडी नदीच्या पुलावर गोवर्धनचा तोल गेला आणि मोटारसायकलन पुलाच्या कठड्यांना आदळली. मात्र, गोवर्धन नदीत पडला आणि पुरात वाहून गेला. घटनेची माहिती मिळताच आरमोरी पोलिसांनी मासेमारी करणाऱ्या नागरिकांच्या साह्याने शोधमोहीम राबविली. परंतु अद्यापही गोवर्धनचा मृतदेह सापडला नाही.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
V0IBT
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना