शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

आदिवासी प्रकल्पाचा सहायक लेखाधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Thursday, 13th November 2014 04:50:00 AM

 
गडचिरोली, ता़१३
वसतिगृहातील विद्यार्थ्यांना भोजन देण्याच्या कामाचे देयक मंजूर करण्याकरिता कंत्राटदाराकडून ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी आज(ता़१३)गडचिरोली येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचा सहायक लेखाधिकारी दत्तात्रय खिरूसिंग राठोड (५०)यास रंगेहाथ पकडून अटक केली़
तक्रारकर्त्या कंत्राटदाराकडे गडचिरोली येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत चालविण्यात येणार्‍या आदिवासी मुलांच्या वसतिगृह क्रमांक २ ला भोजन पुरविण्याचे काम होते़ त्याने मे २०१४ च्या कामाचे २ लाख ८९ हजार रुपयांचे देयक आदिवासी विकास प्रकल्पाकडे सादर केले होते़ परंतु हे देयक मंजूर करण्याकरिता सहायक लेखाधिकारी दत्तात्रय राठोड याने संबंधित कंत्राटदाराकडे पैशाचा तगादा लावला़ अखेर त्रस्त होऊन कंत्राटदाराने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली़ त्याअनुषंगाने आज एसीबीच्या अधिकार्‍यांनी दुपारी एलआयसी चौकात सापळा रचला़ दुपारी २ वाजता दत्तात्रय राठोड यास कंत्राटदाराकडून ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडून अटक केली़
एसीबीचे पोलिस उपायुक्त प्रकाश जाधव, अपर पोलिस अधीक्षक श्री़ मतकर, उपअधीक्षक रोशन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक डी़डब्लू़मंडलवार व पोलिस निरीक्षक एम़एस़टेकाम यांच्या नेतृत्वात सहायक फौजदार मोरेश्वर लाकडे, हवालदार विठोबा साखरे, सत्यम लोहंबरे, पोलिस नाईक परिमल बाला, वसंत जौंजाळकर, शिपाई नरेश आलाम, उमेश मासुरकर यांनी ही कारवाई केली़ 
गडचिरोली येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या अधिकार्‍यावर एसीबीने धाड टाकण्याची ही दुसरी वेळ आहे़ दोन वर्षापूर्वी येथील एका लेखाधिकार्‍यास एसीबीने अटक केली होती़ एकात्मिक विकास प्रकल्पात अनेक कामांचे कंत्राट दिले जात असून, यापूर्वी बरीच कामे बोगस करण्यात आली आहेत़ तत्कालिन प्रकल्प अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने ही कामे बोगस झाली आहेत़ विद्यमान प्रकल्प अधिकारी पी़ शिवशंकर यांनी या सर्व कामांची चौकशी केल्यास मोठे घबाड बाहेर येऊन बर्‍याच जणांना तुरुंगाची हवा खावी लागेल, अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे़   


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
1SAED
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना