रविवार, 22 सप्टेंबर 2019
लक्षवेधी :
  आष्टीच्या ठाणेदाराची सुशिक्षित दाम्पत्यास अभद्र वागणूक- जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांकडे केली तक्रार             आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करणार-जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची माहिती             निष्कृष्ट बंधारा बांधकाम प्रकरणी मृद व जलसंधारण विभागाचे उपविभागीय अभियंता, कनिष्ठ अभियंता व कंत्राटदारावर कोरची पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

शिक्षण मंडळाची घोडचूक: उपस्थित विद्यार्थिनीस गैरहजर दाखवून केले नापास

Saturday, 8th June 2019 02:26:06 PM

 

बंडुभाऊ लांजेवार/कुरखेडा, ता.८: आज शालांत परिक्षेचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थी 'कही खुशी, कहीं गम', असा अनुभव घेत असताना परीक्षा दिलेल्या कुरखेड्याच्या एका विद्यार्थिनीला गैरहजर दाखविल्याचे कळताच धक्काच बसला.

संस्कृती सुरेश दहीकर असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती कुरखेडा येथील शिवाजी हायस्कूलमध्ये शिकत होती. यंदा तिने अन्य विद्यार्थ्यांप्रमाणेच दहावीची परीक्षा दिली. शिवाजी हायस्कूल येथेच तिचे परीक्षा केंद्र(केंद्र क्रमांक १९५३) होते. तिने सर्व विषयांचे पेपर दिले होते. 

आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकालाची घोषणा केली. मात्र, गुणपत्रकावर मराठी विषयात 'अनुपस्थित' दाखविण्यात आल्याचे दिसताच संस्कृतीला धक्काच बसला. दुपारपासून ती हुंदके देत रडत होती. तिने ही बाब आपल्या शिक्षकांना सांगितली. त्यांनी संस्कृतीची समजूत काढत ही चूक परीक्षा मंडळाची असल्याचे सांगितले.

संस्कृती ही हुशार मुलगी असून, तिला गणितात ८३, सामाजिक विज्ञान विषयात ८३, विज्ञान व तंत्रज्ञान विषयात ७५, इंग्रजीत ५४ व हिंदीत ५५ गुण आहेत. मराठी विषयातही आपणास किमान ५५ गुण मिळाले असते, असे तिचे म्हणणे आहे. मात्र, पेपर देऊनही अनुपस्थित दर्शविल्याने संस्कृती प्रचंड निराश झाली आहे. संस्कृतीचे वडील वनरक्षक असून, आई अंगणवाडी सेविका आहे. तिच्या सर्वांत मोठ्या बहिणीने एम.एस.सीचे शिक्षण पूर्ण केले आहे, तर दुसरी बहीणदेखील एमएससी करीत आहे. हुशार विद्यार्थिनीवर असा प्रसंग ओढवला असेल, तर सर्वसामान्य विद्यार्थिनींचे काय, शिक्षण मंडळ आपली चूक दुरुस्त करुन देईल काय, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
EKWH3
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना