शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

धान भरडाई करण्यास मॉ शारदा स्टीम प्रॉडक्टवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

Monday, 20th May 2019 07:34:48 AM

गडचिरोली, ता.२०: एकाच ठिकाणी दोन वेगवेगळ्या राईस मिलचे फर्म दाखवुन बनावट दस्तऐवजांच्या आधारे आदिवासी विकास महामंडळाशी करारनामा करुन धान भरडाईचे काम मिळविणाऱ्या देसाईगंज तालुक्यातील कुरुड येथील मॉ शारदा स्टीम प्रॉडक्टला धान भरडाई करण्यास बंदी घालणारा आदेश आज जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला आहे. 

एकाच ठिकाणी दोन वेगवेगळ्या राईस मिलचे फर्म दाखवुन बनावट दस्तऐवजांच्या आधारे गडचिरोली येथील आदिवासी विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाशी करारनामा करुन फसवणुक केल्याने दोन्ही राईस मिलच्या मालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत देसाईगंज येथील यशवंत नाकतोडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे १५ एप्रिल २०१९ ला तक्रार केली होती. गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यात आरमोरी-देसाईगंज मार्गावर कोंढाळा गावानजीकच्या वडेगाव रिठ साझामधील वन विभागाच्या राखीव जागेवर अतिक्रमण करुन व उर्वरित स्वमालकीच्या अकृषक जागेवर एकाच ठिकाणी जय अंबे राईस मिल व मॉ शारदा स्टीम प्लॉंट असे दोन वेगवेगळ्या नावांचे राईस मिल फर्म दाखविण्यात आले. त्यानंतर बनावट दस्तऐवजांच्या आधारे आदिवासी विकास महामंडळाशी करारनामा करुन दोन्ही फर्मनी धान भरडाईचे काम मिळविले.परंतु मॉ शारदा स्टीम प्लॉंट हा केवळ कागदोपत्रीच आहे. शिवाय करारनामा करताना जोडलेली संपूर्ण कागदपत्रे बनावट असून, बँक गॅरंटीदेखील खोटी आहे, तसेच मॉ शारदा स्टीम प्लॉंटला स्वतंत्र व अखंड विद्युत पुरवठा सुरु असल्याचे प्रमाणपत्र घेण्यात आले नाही, असे यशवंत नाकतोडे यांनी तक्रारीत म्हटले होते.

तक्रारीअंती आदिवासी विकास महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापकांनी चौकशी करुन जिल्हाधिकाऱ्यांकडे आपला अहवाल सादर केला. मॉ शारदा स्टीम प्रॉडक्ट हा उद्योग कच्चा तांदूळ निर्माण करणारा नाही, असे व्यवस्थापकांनी आपल्या अहवालात म्हटले. त्यानुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी आज आदेश जारी करुन मॉ शारदा स्टीम प्रॉडक्टला धान भरडाईकरिता देऊ नये तसेच त्यांचा भरडाईबाबतचा करारनामा रद्द करावा, असे म्हटले आहे.

  


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
04RNT
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना