शनिवार, 27 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

वादळी पावसामुळे कुरंडीमाल येथील सहकारी संस्थेच्या धानाचे मोठे नुकसान.

Monday, 22nd April 2019 07:03:00 AM

आरमोरी,ता.२२:  तालुक्यातील कुरंडीमाल येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेने खरेदी केलेल्या धानाची आदिवासी विकास महामंडळाने उचल न केल्याने वादळी पाऊस व गारपिटीमुळे धानाची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली आहे. 

कुरंडीमाल येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेने वडेगाव येथे आधारभुत धान खरेदी केली आहे. मागील वर्षी चांगला पाऊस पडल्याने या केद्रावर १३८९४ क्विंटल अशी विक्रमी धान खरेदी झाली. त्यातील ६७५० क्विंटल धानाची उचल आदिवासी विकास महामंडळाने केली. परंतु ६९४४ क्विंटल धानाची उचल करण्यात आली नाही. हे धान उघड्यावर ठेवण्यात आले आहेत. परंतु २१ एप्रिलच्या संध्याकाळी अचानक वादळी पाऊस व गारपीट झाल्याने मोठ्या प्रमाणात धानाची नासाडी झाली. ओले झालेले धान कुजण्याच्या स्थितीत असून, कुरंडीमाल येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या संचालकांनी नुकसानीचा पचंनामा करुन तत्काळ धानाची उचल करण्याची मागणी आदिवासी विकास महामंडळाकडे केली आहे.

सरपच टिकेश कुमरे, सभापती प्रल्हाद गेडाम, टेभुणे, वनवे, तलाठी कवडो, ग्रामसेवक माकडे, डहारे, सचिव पुरुषोत्तम कडाम, सुधाकर उसेंडी, धर्मा बावणे, श्रीपाद मडकाम, के.एस. कुळसंगे, गणपत उईके, ऋषी बडे, बाबूराव मडावी, वैशाली गेडाम, यशवंत कांबळे, मनोहर भैसारे, मिनाक्षी मुर्वतकार आदीनी यासंदर्भात महामंडळाला निवेदन पाठविले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
8720H
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना