शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

आरमोरी तालुक्यात गारपीट, अन्य भागाला वादळाचा तडाखा

Sunday, 21st April 2019 07:01:57 AM

गडचिरोली, ता.२१: आरमोरी तालुक्यात आज संध्याकाळी विजांचा कडकडाट व गारपिटीसह जोरदार पाऊस पडला. जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी जोरदार वादळ आल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले.

आरमोरी शहर व तालुक्यात संध्याकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. गडचिरोली, चामोर्शी व अहेरी तालुक्यालाही वादळाचा फटका बसला. गडचिरोली-आरमोरी मार्गावरील साखरा-काटली गावादरम्यान वादळामुळे एक मोठे झाड रस्त्यावर कोलमडून पडले. यामुळे बराच वेळ वाहतूक ठप्प होती. आज गडचिरोली येथील आठवडी बाजार होता. दिवसभर बाजार सुरळीत होता. परंतु संध्याकाळी अचानक जोरदार वादळ आल्याने भाजीविक्रेत्यांची तारांबळ उडाली. अनेक दुकानांवरील बोर्ड आणि टिनपत्रेही उडाली. सकाळी देसाईगंज तालुक्यालाही पावसाने झोडपले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
150OV
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना