शनिवार, 27 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

नक्षल्यांनी केले लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन

Friday, 5th April 2019 07:47:47 AM

गडचिरोली,ता.५: लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असताना नक्षल्यांनी जिल्ह्याच्या पूर्वोतर भागात बॅनर लावून निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

येत्या ११ एप्रिलला गडचिरोली-चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रासाठी मतदान होणार आहे. त्यासाठी विविध राजकीय पक्षांनी प्रचाराची रणधुमाळी सुरु केली आहे. परंतु दुर्गम भागात नक्षल्यांनी बॅनर लावून लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केल्याने नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे. कोरची तालुक्यातील मसेली, धानोरा तालुक्यातील देवसूर व भामरागड तालुक्यातील काही गावांलगत असे बॅनर आढळून आले आहेत. या बॅनरवर नक्षल्यांनी भाजपवर टीका केली असून, भाजप हा लोकविरोधी तसेच, दलित, आदिवासी, मुस्लिम व महिलांवर अन्याय करणारा पक्ष असल्याने या पक्षास हद्दपार करा, असे आवाहन नक्षल्यांनी केले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
KALAU
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना