रविवार, 24 मार्च 2019
लक्षवेधी :
  दूषित पेयजलामुळे तळेगावात अतिसाराची लागण; १९ जण भरती             विदर्भातील दहाही जागा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी जिंकेल-काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आ.विजय वडेट्टीवार यांचा विश्वास             हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार डॉ.नामदेव उसेंडी यांचा उमेदवारी अर्ज दाखल             गडचिरोली-चिमूर क्षेत्रातून अशोक नेते यांना पुन्हा भाजपची उमेदवारी जाहीर             जीवंत वीज तारांच्या स्पर्शाने दोघांचा मृत्यू- मुलचेरा तालुक्यातील विवेकानंदपूर येथील रंगपंचमीच्या दिवशीची घटना             शिक्षक योगेंद्र मेश्रामच्या हत्येबद्दल नक्षल्यांनी पत्र पाठवून व्यक्त केली दिलगिरी             दुष्काळाच्या झळा: पड्यालजोग ग्रामसभेने केली २० मृतांची एकत्र तेरवी             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

लाचखोर अभियंता पितांबर बोदेले यास १६ मार्चपर्यंत पोलिस कोठडी

Friday, 15th March 2019 01:39:44 PM

 

गडचिरोली, ता.१५: मंजूर झालेल्या सिंचन विहिरीचे अंतिम देयक काढून देण्यासाठी लाभार्थीकडून चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेला जिल्हा परिषद सिंचन विभागाचा शाखा अभियंत पितांबर बोदेले यास जिल्हा व सत्र न्यायालयाने १६ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

'११००० धडक सिंचन विहिरी कार्यक्रम २०१६-१७' अंतर्गत एका लाभार्थीस मंजूर झालेल्या विहिरीचे अंतिम देयक काढून देण्याच्या कामाकरिता गडचिरोली येथील सिंचन विभागाचा शाखा अभियंता पितांबर बोदेले याने ४ हजार रुपयांची मागणी केली. परंतु लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने लाभार्थीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीवरुन काल(ता.१४) या विभागाच्या अधिकाऱ्यांनी पितांबर बोदेले यास तक्रारकर्त्याकडून ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडून त्याच्यावर गडचिरोली पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल केला होता. आज त्याला जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यास १६ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. एसीबीचे पोलिस निरीक्षक रवी राजुलवार घटनेचा तपास करीत आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
U8BL0
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना