शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

गडचिरोलीत नवीन केंद्रीय विद्यालयास मंजुरी

Thursday, 7th March 2019 07:09:17 AM

गडचिरोली, ता.७: येथे शासनाने केंद्रीय विद्यालयास मंजुरी दिली आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज दूरध्वनीवरुन खा. अशोक नेते यांना ही माहिती दिली. केंद्रीय विद्यालय सुरु होणार असल्याने गडचिरोली जिल्ह्याचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यास मोठी मदत होणार आहे.

२०१४ मध्ये खासदार झाल्यानंतर अशोक नेते यांनी लोकसभेत तारांकित प्रश्न, शून्य प्रहर व नियम ३७७ अन्वये जिल्ह्याच्या विकासासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले. जिल्ह्यातील नवोदय विद्यालयाचा शैक्षणिक व भौतिक दर्जा वाढविणे व गडचिरोली येथे केंद्रीय विद्यालयाची निर्मिती करणे, याही महत्वाच्या प्रश्नाचा त्यात समावेश होता. त्यासाठी खा.अशोक नेते यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांना अनेकदा भेटून आपली मागणी रेटून धरली होती. त्यानंतर स्मृती इराणी यांनी तसा प्रस्ताव पाठविण्याची सूचना जिल्हा प्रशासनाला केली होती. परंतु गडचिरोली येथे केंद्रीय कर्मचाऱ्यांची संख्या पुरेशी नसल्याने अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे खा.नेते यांनी विशेष बाब म्हणून जिल्हा प्रशासनाने केंद्रीय विद्यालयाचा प्रस्ताव राज्य शासनामार्फत केंद्र शासनाकडे पाठवावा, अशी सूचना तत्कालिन जिल्हाधिकारी श्री.रणजितकुमार यांना केली होती. 

त्यानंतर पुन्हा नवे केंद्रीय मानवसंसाधन मंत्री प्रकाश जावडेकर यांना भेटून खा.अशोक नेते यांनी मागणीचा आग्रह कायम ठेवला. शेवटी शासनाने विशेष बाब म्हणून आदिवासीबहुल व मागास जिल्हा अशी ओळख असलेल्या गडचिरोलीत केंद्रीय विद्यालय सुरु करण्यास मंजुरी प्रदान केली आहे. केंद्रीय विद्यालयात नवोदय विदयालयाप्रमाणेच पहिली ते दहावीपर्यंत दर्जेदार शिक्षणाची सोय असते. परंतु नवोदय विद्यालयाप्रमाणे ती निवासी नसते. या विद्यालयावर केंद्र सरकारचे प्रत्यक्ष नियंत्रण असते.

गडचिरोलीत केंद्रीय विद्यालयास मंजुरी मिळवून आणल्याबद्दल खा.अशोक नेते यांचे नागरिकांकडून आभार मानले जात आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
VZRF6
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना