शनिवार, 27 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

विदर्भ तेली समाज महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी सुरेश भांडेकर, सरचिटणीस प्रा.देवानंद कामडी

Saturday, 23rd February 2019 12:55:00 AM

गडचिरोली, ता.२३: विदर्भ तेली समाज महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष रघुनाथ शेंडे यांच्या मार्गदर्शनानुसार, विदर्भ तेली समाज महासंघाची गडचिरोली जिल्हा कार्यकारिणी गठित करण्यात आली असून, महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी सुरेश भांडेकर, तर जिल्हा सरचिटणीसपदी प्रा.देवानंद कामडी यांची निवड करण्यात आली आहे.

नागपूर येथे पार पडलेल्या विदर्भ तेली समाज महासंघाच्या केंद्रीय बैठकीत ही निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी विजय बाभूळकर हे होते. या बैठकीत जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर सुरेश भांडेकर यांनी जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली. या कार्यकारिणीत उपाध्यक्ष गोपीनाथ चांदेवार, सहसचिव रामराज करकाडे, केंद्रीय सदस्य सुधाकर दुधबावरे, सदस्य सर्वश्री महादेव वाघे, सुधाकर लाकडे, अनिल बालपांडे, विठ्ठलराव कोठारे यांचा समावेश आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
E9J0I
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना