शनिवार, 27 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

६ जानेवारीला गडचिरोलीत अमोल मिटकरी यांचे व्याख्यान

Friday, 4th January 2019 11:02:55 PM

गडचिरोली, ता.५: भिमा कोरेगाव शौय दिन, सावित्रीबाई फुले व जिजाऊंच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक संघटनांच्या वतीने गडचिरोली येथे ६ जानेवारीला प्रसिद्ध वक्ते अमोल मिटकरी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

रविवारी दुपारी १२ वाजता चामोर्शी मार्गावरील जिल्हा परिषद हायस्कूलच्या पटांगणावर हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी भंडारा येथील मूळनिवासी महिला संघाच्या जिल्हाध्यक्ष शरयू डहाट यादेखील मार्गदर्शन करणार आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे जिल्हा सचिव विलास निंबोरकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार असून, विशेष अतिथी म्हणून माळी महिला संघटनेच्या अध्यक्ष सुधा चौधरी, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी संचिव ओहोळ उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघ, सोशल एज्युकेशन मुव्हमेंट, बामसेफ, महिला मैत्री संघ, भारिप बहुजन महासंघ, बीआरएसपी, भारतीय विद्यार्थी मोर्चा, आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया आदींनी केले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
6ARE2
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना