शनिवार, 23 फेब्रुवारी 2019
लक्षवेधी :
  आरमोरी नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी भाजपचे हैदरभाई पंजवानी यांची बहुमताने निवड             दुसऱ्या दिवशीही पेंढरी येथे तालुका निर्मितीसाठी हजारो नागरिकांचे आंदोलन सुरुच             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे ५ डिसेंबरला गडचिरोलीत

Monday, 3rd December 2018 12:12:34 PM

गडचिरोली, ता.३: युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे पाटील हे बुधवारी ५ डिसेंबर रोजी गडचिरोलीत येणार असून, युवक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीला ते संबोधित करणार आहेत.

युवक काँग्रेसचे लोकसभा अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक ५ डिसेंबरला सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आली असून, त्यात सत्यजित तांबे मार्गदर्शन करणार आहेत. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत युवक काँग्रेसची भूमिका महत्वाची असून, या निवडणुकांमध्ये युवकांना जास्तीत जास्त संधी मिळावी, यासाठी सत्यजित तांबे यांनी विदर्भाचा दौरा आयोजित केला आहे. या बैठकीला युवक कॉग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महेद्र ब्राम्हणवाडे यांनी केले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
BL9L1
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना