शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा उपविभागीय अभियंता एसीबीच्या जाळ्यात

Wednesday, 28th November 2018 07:46:55 AM

गडचिरोली, ता.२८: ग्रामीण पाणीपुरवठ्याच्या कामाचे देयक मंजूर करुन दिल्याचा मोबदला म्हणून तक्रारकर्त्या कंत्राटदाराकडून ६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज गडचिरोली जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा उपविभागीय अभियंता रमेश सोमाजी शेंडे(५२) यास रंगेहाथ पकडून अटक केली.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्ता हा गडचिरोली येथील रहिवासी असून, राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत गडचिरोली उपविभागातील ग्रामपंचायतींतर्गत ग्रामीण पाणीपुरवठ्याबाबतच्या शासकीय कंत्राटदारीचे काम करतो. त्याने केलेल्या जुन्या कामाचे देयक उपविभागीय अभियंता श्री.शेंडे याने मंजूर करुन दिले. या कामाचा मोबदला म्हणून त्याने तक्रारकर्त्यास २ टक्के याप्रमाणे ६ हजार रुपयांची लाच मागितली.

मात्र, लाच देण्याची तक्रारकर्त्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने गडचिरोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार या विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज सापळा रचला असता, उपविभागीय अभियंता रमेश शेंडे यास तक्रारकर्त्याकडून ६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंचांसमक्ष रंगेहाथ पकडले. त्यामुळे एसीबीने त्याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम ७,१३(१)(अ)अन्वये गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपायुक्त पी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधीक्षक डी.एम.घुगे, पोलिस निरीक्षक रवी राजुलवार, हवालदार प्रमोद ढोरे, नथ्थू धोटे, सतीश कत्तीवार, सुधाकर दंडीकवार, महेश कुकुडकर, गणेश वासेकर, किशोर ठाकूर, सुभाष सालोटकर, सोनल आत्राम, सोनी तावाडे, तुळशीदास नवघरे,घनश्याम वडेट्टीवार यांनी ही कारवाई केली


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
BF15S
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना