शनिवार, 23 फेब्रुवारी 2019
लक्षवेधी :
  आरमोरी नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी भाजपचे हैदरभाई पंजवानी यांची बहुमताने निवड             दुसऱ्या दिवशीही पेंढरी येथे तालुका निर्मितीसाठी हजारो नागरिकांचे आंदोलन सुरुच             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

पोर्ला येथे ग्रामगीता वाचन सप्ताहास प्रारंभ

Saturday, 17th November 2018 12:00:10 PM

गडचिरोली, ता.१७: तालुक्यातील पोर्ला येथील स्व.तुळसाबाई दशमुखे स्मृतीप्रित्यर्थ व दैनिक गडचिरोलीपत्रिकेच्या वतीने कार्तिक पौर्णिमेच्या काल्यानिमित्त श्री शिवमंदिर येथे आजपासून ग्रामगीता वाचन सप्ताहास प्रारंभ झाला आहे.

२३ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या सप्ताहादरम्यान ह.भ.प. डोमाजी महाराज झरकर यांच्या मधूर वाणीतून रसिकांना ग्रामगीता वाचनाचा आनंद मिळणार आहे. आज सकाळी घटस्थापना करण्यात आली असून, दररोज सकाळी व सायंकाळी सामुदायिक प्रार्थना, रामधून व ग्रामगीता वाचनाचा कार्यक्रम होणार आहे.

आजच्या कार्यक्रमाप्रसंगी केशवराव दशमुखे, ज्ञानेश्वर फरांडे, भानुदास शेंद्रे, विलास दशमुखे, रामचंद्र दशमुखे, मनोज किरमिरे, संतोष दशमुखे, साईनाथ वाघरे, गजानन बारसागडे, पांडुरंग सूर्यवंशी, हरीश बानबले, प्रभाकर लाडवे, महादेव बोंबोले, सिंधू दशमुखे, कांचन दशमुखे, लता दशमुखे, योगीता दशमुखे, सायत्राबाई कलसार व गावातील नागरिक उपस्थित होते. नागरिकांनी ग्रामगीता वाचन सप्ताहाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केशवराव दशमुखे यांनी केले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
9441M
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना