शनिवार, 23 फेब्रुवारी 2019
लक्षवेधी :
  आरमोरी नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी भाजपचे हैदरभाई पंजवानी यांची बहुमताने निवड             दुसऱ्या दिवशीही पेंढरी येथे तालुका निर्मितीसाठी हजारो नागरिकांचे आंदोलन सुरुच             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

कबड्डी स्पर्धेत कोटगावचा महाकाली क्लब ठरला विजेता

Thursday, 15th November 2018 12:36:15 PM

चामोर्शी, ता.१५: घारगाव येथील नवयुवक भाद्रपद गणेश मंडळाच्या वतीने आयोजित क्रीडा संमेलनात प्रौढांच्या कबड्डी स्पर्धेत कोटगाव येथील महाकाली क्लबने विजेतेपद पटकावले. 

या क्रीडा संमेलनात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील एकुण ६० संघांनी भाग घेतला होता. रात्री व दिवसा अशा दोन्ही सत्रांत  कबड्डी स्पर्धा घेण्यात आल्या. चंद्रपूर जिल्ह्यातील कोटगाव येथील महाकाली क्लबने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. घारगावच्या नवयुवक कबड्डी संघाने द्वितीय, घोनाड येथील जय शिवाजी कबड्डी संघाने तृतीय क्रमांक पटकावला.. स्पर्धेतील विजेत्यांना  शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस दिनेश चुधरी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. 

यावेळी शेकापचे प्रदीप आभारे, रमेश चौखुंडे, मंडळाचे अध्यक्ष संदीप आभारे, सचिव व्यंकटेश बोरकुटे प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या आयोजनासाठी नवयुवक भाद्रपद गणेश मंडळाचे कार्यकर्ते निलोज धोटे, पत्रू आभारे, नलेश ठाकरे, आकाश झोडक, प्रवीण भगत, संदीप ठाकरे, तोताजी भगत, संदीप बोरकुटे, निकेश भगत, किशन कोहपरे, लीलानाथ कोहपरे, धनराज काटवले, मंगेश आभारे, प्रफुल्ल लाटकर, रूपेश तुमडे, शरद मंगर, विजय आभारे, छबिलदास बोरकुटे यांनी सहकार्य केले. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
V4K04
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना